Bala Nandgaonkar: काय थट्टा चालवली आहे, राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरून बाळा नांदगावकर संतापले

| Updated on: May 13, 2022 | 7:44 PM

Bala Nandgaonkar: मला असं वाटतंय देशाच्या गृहमंत्र्यांकडे आम्ही सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांना लेखी स्वरुपात पत्र ही पाठवलेले आहे.

Bala Nandgaonkar: काय थट्टा चालवली आहे, राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरून बाळा नांदगावकर संतापले
काय थट्टा चालवली आहे, राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरून बाळा नांदगावकर संतापले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी मनसेने केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने (maharashtra government) वाढ केली आहे. राज ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा तशीच ठेवून त्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला आहे. राज यांच्या सुरक्षेत अत्यंत मामूली वाढ केल्याने मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) संतापले आहेत. ही थट्टा चालवली आहे. आम्ही मागणी काय करतोय? अन् तुम्ही सुरक्षा काय देता. एखादा इन्स्पेक्टर किंवा एखादा हवालदार फक्त सुरक्षेसाठी वाढवून दिला आहे. ज्याला नाही पाहिजे त्याला संरक्षण देत आहात. ज्यांना खरोखरच गरज आहे, त्यांना संरक्षणाच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता दाखवत आहात. काय थट्टा चालवली आहे? असा संतप्त सवाल बाळा नांदगावकर यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारने राज ठाकरे यांना दिलेल्या जुजबी सुरक्षेवरून नांदगावकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मला असं वाटतंय देशाच्या गृहमंत्र्यांकडे आम्ही सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांना लेखी स्वरुपात पत्र ही पाठवलेले आहे. राज ठाकरे यांना झेड प्लसची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यावर केंद्र सरकार काय विचार करते मला माहिती नाही. परंतु केंद्र सरकारकडून फार मोठी अपेक्षा धरू शकत नाही. पण आम्ही राज्य सरकारकडे अपेक्षा धरू शकतो, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कुचराई न करता सुरक्षा वाढवा

मला असं वाटतंय त्यांनी कुचराई न करता राज यांची ताबडतोब सिक्युरीटी वाढवावी. त्याने त्यांचाच मान सन्मान वाढणार आहे. ही चर्चा सरकारने चालवलेली आहे. आम्ही काय करतोय, त्यांना थ्रेड किती आहे. हे काल-परवा आलेलं पत्र आहे त्यात राज साहेबांचा उल्लेख आहे. आता कुणी पत्र पाठवलंय, कोणत्या संघटनेने पत्र पाठवलंय आता पोलिस तपास करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

दोन कर्मचारी वाढले

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच ( Y +) आहे. मात्र त्यात पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. राज यांच्या सुरक्षेत एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला आहे. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. नांदगावकर यांनी नुकतीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन राज यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहाता सुरक्षेतील पोलीस कर्मचारी संख्येत करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.