मुंबईकरांचा ‘बेस्ट’ प्रवास आजपासून स्वस्त, बेस्टचे किमान तिकीट 8 रुपयांवरुन 5 रुपये

| Updated on: Jul 09, 2019 | 11:02 AM

बेस्ट बसच्या दरकपातीच्या प्रस्ताव आजपासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना किमान भाड्यासाठी 8 रुपयांऐवजी फक्त 5 रुपये मोजावे लागत आहे.

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास आजपासून स्वस्त, बेस्टचे किमान तिकीट 8 रुपयांवरुन 5 रुपये
Follow us on

मुंबई : बेस्ट प्रवाशांचा प्रवास आजपासून स्वस्त झाला आहे. कारण काही दिवसांपूर्वी मान्यता मिळालेल्या बेस्ट बसच्या दरकपातीचा प्रस्ताव आजपासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना किमान भाड्यासाठी 8 रुपयांऐवजी फक्त 5 रुपये मोजावे लागत आहे. विशेष म्हणजे बेस्टच्या या प्रस्तावाला राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे आज (9 जुलै) पासून बेस्टच्या प्रवास दरात कपात करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात 21 जूनला ‘बेस्ट’ उपक्रमाने प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी या नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार प्रवाशांना पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले होते. याआधी बससाठी पहिल्या 2 किमीला 8 रुपये तिकीट दर होता. मात्र आता पहिल्या 5 किमीला 5 रुपये आणि एसी बससाठी 6 रुपये मोजावे लागणार असल्याचे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आलं होतं.

यानुसार मुंबईतील बेस्ट भवनात 25 जूनला झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर काल (8 जुलै) राज्य शासनाच्या परिवहन विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

नवीन तिकीट दर 

कि.मी – साधी बस – एसी बस

5 किमी – 5 रुपये – 6 रुपये

10 किमी – 10 रुपये – 13 रुपये

15 किमी – 15 रुपये – 19 रुपये

पास : 

साधी बस 50 रुपये
एसी बस 60 रुपये

कि.मी.साधी बस एसी बस 
मासिकत्रैमासिकमासिकत्रैमासिक
5250 रुपये750 रुपये300 रुपये900 रुपये
10500 रुपये1500 रुपये650 रुपये1,950 रुपये
15750 रुपये2,250 रुपये950 रुपये2,850 रुपये
15 किमीपेक्षा अधिक1,000 रुपये3,000 रुपये1,250 रुपये3,750 रुपये

दरकपातीचा प्रस्ताव कशासाठी ?

बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी 600 कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र तीन महिन्यांत प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढ हे दोन बदल दिसले पाहिजेत, अशी अट घातली होती. तसेच बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचा आदेश करारात सामाविष्ट करण्यात आला होता. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.  त्यानुसार बेस्ट उपक्रमाने दरकपातीचा प्रस्ताव तयार केला होता.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना खुशखबर, बेस्टचं किमान तिकीट 5 रुपये

मुंबईकरांना ‘बेस्ट’ दिलासा, 5 किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट

मुंबई : बेस्ट बस वाचवण्यासाठी खालसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हटके आयडिया   

 ‘या’ 10 निकषांवर ‘बेस्ट’चा संप मागे