मुंबईकरांना खुशखबर, बेस्टचं किमान तिकीट 5 रुपये

बेस्ट बस दरकपातीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  त्यानुसार बेस्टचं किमान भाडं ८ रुपयांवरुन ५ रुपये करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

best bus minimum fare, मुंबईकरांना खुशखबर, बेस्टचं किमान तिकीट 5 रुपये

मुंबई : बेस्ट बस दरकपातीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  त्यानुसार बेस्टचं किमान भाडं ८ रुपयांवरुन ५ रुपये करण्यात आले.  मुंबईतील बेस्ट भवनात आज (25 जून) झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. नव्या प्रस्तावानुसार आता प्रवाशांना पाच किमीसाठी केवळ 5 रुपयाची तिकीट काढावी लागणार आहे.  त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘बेस्ट’ उपक्रमाने प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी हा नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले होते. सध्या बससाठी पहिल्या 5 किमीला 5 रुपये तर एसी बससाठी 6 रुपये किमान तिकीट दर असेल असे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी 600 कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले होते. मात्र तीन महिन्यांत प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढ हे दोन बदल दिसले पाहिजेत, अशी अट घातली होती. तसेच बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचा आदेश करारात सामाविष्ट करण्यात आला होता. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.  त्यानुसार बेस्ट उपक्रमाने दरकपातीचा प्रस्ताव तयार केला होता.

नवीन प्रस्तावानुसार, प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच राहतील.  दरकपातीच्या प्रस्तावानुसार चार टप्प्यानुसार तिकीट दर ठरवण्यात येतील. त्यानुसार 5 किमी, 10 किमी, 15 किमी आणि त्यापुढे असे हे चार टप्पे असतील. त्यानुसार 5 किमीपर्यंत 5 रुपये, 10 किमीपर्यंत 10 रुपये, 15 किमीला 15 रुपये आणि त्यापुढील टप्प्याला 20 रुपये तिकीट दर असेल.  एसी बसचे प्रवास आणि तिकीटाचे टप्पे वेगळे असतील.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना ‘बेस्ट’ दिलासा, 5 किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट

मुंबई : बेस्ट बस वाचवण्यासाठी खालसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हटके आयडिया   

 ‘या’ 10 निकषांवर ‘बेस्ट’चा संप मागे 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *