सर्वात मोठ्या महापालिकेतील धक्कादायक घोटाळा, एकाच स्टँम्प पेपरवर दोन करार; सोमय्या यांचा गंभीर आरोप काय?

| Updated on: Jan 21, 2023 | 12:06 PM

पोपट काही खात नाही, पोपटाला काही ऐकायला येत नाही, पोपट पाणी पित नाही. पोपट पेरू खात नाही, असं काही अहवालात म्हटलेलं नाही. फक्त पोपट मेलाय असं म्हटलेलं नाही.

सर्वात मोठ्या महापालिकेतील धक्कादायक घोटाळा, एकाच स्टँम्प पेपरवर दोन करार; सोमय्या यांचा गंभीर आरोप काय?
kirit somaiya
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला आहे. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करण्यात आलं आहे. पण कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच एकाच स्टँम्प पेपरवर महापालिकेने दोन करार केल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली असून या प्रकरणी महापालिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य केलं. महापालिकेच्या कोरोना काळातील घोटाळ्याबाबत मी आझाद मैदान कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने चौकशी करायला सांगितली होती.

हे सुद्धा वाचा

पालिकेचे तत्कालीन नेत्यांनी दोन सदस्यांची समिती नेमली. सहआयुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. महापालिकेने 6 एप्रिल 2022ला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. जून 2022ला या समितीने अहवाल दिला होता, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

22 जुलै रोजी न्यायालयात, पोलीस स्टेशनला अहवाल दिला. एप्रिल आणि मेमध्ये चौकशी केली ती गजब आहे. समितीच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की, लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वात केव्हा आली यावर महापालिकेने लिगल ओपिनियन मागितलं होतं. त्यावर विधी विभागाने सल्ला दिला आहे.

या कंपनीची नोटरी फोर्जरी आहे, असं विधी विभागाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात पार्टनरशीप डीड करणं राज्यात कायद्याने बंधनकारक असल्याचंही विधी विभागाने म्हटलं आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

कोणतीही सरकारी संस्था रजिस्टर कंपनीचीशीच करार करू शकते. कराराची सही 2010 रोजीची दाखवली आहे. पण नोटरी 2020मध्ये केली आहे. एकाच मुद्रांकवर दोन वेगवेगळे करार देण्यात आल्याचं असं स्पष्ट म्हटलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

पोपट काही खात नाही, पोपटाला काही ऐकायला येत नाही, पोपट पाणी पित नाही. पोपट पेरू खात नाही, असं काही अहवालात म्हटलेलं नाही. फक्त पोपट मेलाय असं म्हटलेलं नाही. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी नेमलेली ही समिती आहे.

सुनील धामणे यांनी स्पष्टपणे म्हटलं की, फोर्जरी झाली आहे. पण अहवालाच्या शेवटी कारवाई करायची गरज नाही, असा शेरा मारल्याचं, सोमय्या यांनी निदर्शनास आणून दिलं.

सर्वात आधी हा रिपोर्ट सही करून फ्रोजरी फ्रॉड सिद्ध झालं आहे. तरीही त्यावर कारवाई करायची नाही? त्यामुळे सुनील धामणेची आधी हकालपट्टी केली पाहिजे. धामणेची चौकशी का केली नाही? असा माझा पोलिसांना सवाल आहे. पालिकेने सुजीत पाटकर आणि लाइफलाइन हॉस्पिटल विरोधात तक्रार का केली नाही? असा सवालही त्यांनी केला.