Amit Satam : पर्यावरणावर बोलणं एक फॅशन झालीय, त्या अभिनेत्यांना शिकवणीची गरज, मुंबई भाजप अध्यक्षांचं वक्तव्य
Amit Satam : "पर्यावरणाचा मुद्दा आला की, आम्हीच एकमेव पर्यावरणाचे कैवारी आहोत अशा अर्विभावात मिरवतात. क्लीन एनर्जीचे कॅलक्युलेशन्स काय, क्लायमेंट चेंजचे कॅलक्युलेशन्स काय, ग्लोबल वॉर्मिंगचे कॅलक्युलेशन्स काय, याची शिकवणी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी, अभिनेत्यांनी करणं आवश्यक आहे"

“शाश्वत विकास म्हणजे काय, तर शाश्वत विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. जेणेकरुन येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या पिढ्या जन्म घेतील, त्या भविष्यातील पिढ्यांना त्यांना या विकासाचा कुठलाही फटका बसता कामा नये, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणजे शाश्वत विकास. परंतु शाश्वत विकास या शब्दाचा खरा अर्थ त्याचं डेफिनेशन अनेक लोक समजून घेत नाहीत. पर्यावरणावर बोलणं एक फॅशन झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर बोलणं एक फॅशन झालेली आहे” अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केले. कर्जत येथील वृक्षतोडीवर सरकारवर प्रचंड टीका सुरु आहे. भीमाशंकरच्या जंगलात एका पंप हाऊस प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. त्यावरुन आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे.
“अनेक लोक पर्यावरणाच्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात. पर्यावरणाचा मुद्दा आला की, आम्हीच एकमेव पर्यावरणाचे कैवारी आहोत अशा अर्विभावात मिरवतात. क्लीन एनर्जीचे कॅलक्युलेशन्स काय, क्लायमेंट चेंजचे कॅलक्युलेशन्स काय, ग्लोबल वॉर्मिंगचे कॅलक्युलेशन्स काय, याची शिकवणी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी, अभिनेत्यांनी करणं आवश्यक आहे, असं आम्हाला वाटतं. पंप स्टोरेज प्लांट म्हणजे वीज निर्मिती प्रकल्प. जगभरात पंप स्टोरेजची क्षमता वाढत आहे. चीन, अमेरिका, जपान या देशात वेगाने पंप स्टोरेज प्रकल्पाने गती घेतली आहे” असं अमित साटम म्हणाले.
त्यांनी शिकवणी घेणं आवश्यक
“क्लीन एनर्जी म्हणजे सोलार एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो पावर एनर्जी आणि पंप स्टोरेजची एनर्जी म्हणेज क्लीन एनर्जी असते. ज्यावेळी 2070 मध्ये भारत नेट एमिशन झीरो होईल. महाराष्ट्राचे आधीचे जे एक पर्यावरण मंत्री होते ते बोलले की, महाराष्ट्र 2050 मध्ये नेट एमिशन झीरो होणार. त्यांना नेट एमीशन झीरोचा अर्थ कळत नाही. कळला असता तर अशा गप्पा मारल्या नसत्या” अशी टीका अमित साटम यांनी केली. “2070 मध्ये आपल्याला नेट एमिशन झीरो व्हायचं असेल तर सोलार एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, विंड एनर्जी आणि पंप स्टोरेज एनर्जी वाढवावी लागेल. कोळशापासून वीज निर्मितीनुळे मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस एमिशन्स होतात. ते एमिशन कमी करण्यासाठी झाडं लावावी लागतात. किती झाडं लावल्यावर कार्बन एमिशन्स नेट झीरो होऊ शकतं याचं एक कॅलक्युलेशन आहे. त्याची शिकवणी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी, अभिनेत्यांनी घेणं आवश्यक आहे” असं अमित साटम म्हणाले.
28 कोटी झाडं लावावी लागतील
“जो कर्जतचा साई डोंगर आहे, तिथे पंप स्टोरेजचा 3000 मेगा वॅटचा प्लान्ट आहे. त्या प्लांटचे काय फायदे आहेत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहेत. त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे. त्याच्या डिटेलमध्ये मला जायचं नाही. प्रेस नोट इश्यू झाली नाही. पण सोलार एनर्जी दिवसा मिळते. रात्रीच्यावेळी मिळत नाही. संध्याकाळी पावर हवी असेल तर कोळशापासून 3000 थर्मल पावर मेगावॅटच्या पावर प्लांटमधून जेवढे कार्बन एमिशन्स होतील. ती कार्बन एमिशन्स कमी करण्यासाठी 28 कोटी झाडं लावावी लागतील. ज्यासाठी मुंबईत 15 पट जागा लागेल” असं अमित साटम म्हणाले.