बाळासाहेब ठाकरे असते तर, राहुल गांधींनी महाराष्ट्रातून हाकलून लावलं असतं…; भाजप नेत्याची काँग्रेसवर सडकून टीका…

| Updated on: Nov 25, 2022 | 8:18 PM

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याआधी त्यांचा इतिहास एकदा वाचवा अशी टीका भाजपनी केली.

बाळासाहेब ठाकरे असते तर, राहुल गांधींनी महाराष्ट्रातून हाकलून लावलं असतं...; भाजप नेत्याची काँग्रेसवर सडकून टीका...
Follow us on

रत्नागिरीः भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर राज्यातील सगळं वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे भाजपमधील नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आज आणि भाजपचे प्रवक्ते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आज राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्यावर सडकून टीका केली.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरच काँग्रेस नेत्यांचेही डोकं वाया गेलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर राहुल गांधी यांनी एकदा रत्नागिरीमध्ये येऊन पाहावं. म्हणजे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळतील. तुम्हाला काय माहिती आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता आहात असा सवालह चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलायला तुमची लायकी तरी आहे काय असा जळजळीत सवालही बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या तक्रारीमुळे काँग्रेस-भाजप असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी माहिती न घेता बोलणे हा डोकं वाया गेल्यातील प्रकार आहे.

राहुल गांधींचा आणि काँग्रेस नेत्यांचा बुद्धीभ्रंश झाला असून त्या सगळ्यांना चांगल्या डॉक्टरांची गरज आहे अशी खरमरीत टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. अशा परिस्थितीत जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर राहुल गांधींना महाराष्ट्रातून हाकलून लावले असते. मात्र आता उलटच गडत आहे. त्यांचे नातू आता टीका करणाऱ्यांची गळाभेट घेत आहेत असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याआधी राहुल गांधी यांनी सावरकर यांनी जिथं शिक्षा भोगली आहे. ज्या ठिकाणी पुस्तकं लिहिली आहेत त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली असती तर त्यांनी कधीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली नसती असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले.