BMC Election 2026 Voting : गोवंडी, मोहम्मद अली रोडवर भगवा गार्ड का नाही? भाजपचा ठाकरेंना सवाल

सुरक्षित मुंबई निर्माण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा, आजचा हा दिवस मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून मुंबईतल्या भविष्यातल्या पिढ्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने हा दिवस ऐतिहासिक ठरो अशी सिद्धीविनायकाच्या चरणी प्रार्थना केली, असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.

BMC Election 2026 Voting : गोवंडी, मोहम्मद अली रोडवर भगवा गार्ड का नाही? भाजपचा ठाकरेंना सवाल
Raj-Uddhav Thackeray
Dinananth Parab | Updated on: Jan 15, 2026 | 1:09 PM

यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधु एकत्र येऊन लढवत आहेत. विधानसभेला दोघांचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटला. त्यामुळे पालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. मुंबईसह पुणे, नाशिक या ठिकाणी ते एकत्र निवडणूक लढवतायत. पण मुंबईवरच त्यांचा सर्वात जास्त फोकस होता. मुंबईत दुबार मतदानाचे प्रकार रोखण्यासाठी ठाकरे बंधुंनी भगवा गार्ड नेमलय.हे भगवा गार्ड मतदान केंद्राजवळ आहे. काही ठिकाणी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. आता या भगवा गार्डवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी जोरदार प्रहार केला आहे.

ठाकरेंचे भगवा गार्ड गोवंडी, मानखुर्द शिवाजी नगर, मालवणी, मोहम्मद अली रोडवर दिसत नाहीयत. सर्व हिंदुंच्या परिसरात हे भगवा गार्ड फिरताना दिसतायत. यातून उद्धव ठाकरेंची निती आणि नियत उघड होते, असा आरोप अमित साटम यांनी केला. गोवंडी, मानखुर्द शिवाजी नगर, मालवणी, मोहम्मद अली रोड हा मुस्लिम बहुल भाग आहे.

Live

Municipal Election 2026

02:18 PM

Maharashtra Municipal Election 2026 : उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच सांगितला थेट निकाल...

02:07 PM

Maharashtra Election 2026 : उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर निवडणूक आयुक्तांचे जाणार पद? घडामोडींना प्रचंड वेग...

02:18 PM

BMC Election 2026 Voting : उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाच्या शेवटच्या घटका, भाजप नेत्याचं मोठ वक्तव्य

01:47 PM

BMC Election 2026 Voting : टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंग रुममधून बाहेर काढण्याचा आदेश, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

02:02 PM

KDMC Poll Percentage : KDMC निवडणूकीत किती टक्के झालं मतदान?

01:53 PM

BMC Election 2026 Voting : लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे

BMC ला परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई

“मुंबई महानगरपालिकेला स्वत:च्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे त्यांची धडपड दिसत आहे. गेल्या 11 वर्षात मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने जे काम झालं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वरळी बीडीडी चाळीत 160 फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.

आज त्यांना देवदेवता आठवले

“मुंबईकरांना हे चांगलं माहित आहे मराठी माणसाचा, मुंबई शहराचा विकास कोणी केला? मुंबई शहराची सुरक्षितता कोण अबाधित ठेऊ शकतं.मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार सर्व भक्तांना आहे. परंतु कोविडच्या काळात मंदिर बंद करणारे आज स्वत:च्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसतायत. आज त्यांना देवदेवता आठवले, हिंदुत्व आठवलं हे चांगलं आहे” असं टीका करताना अमित साटम म्हणाले.