AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election Voting Percentage 2026 LIVE : महापालिकांच्या मतदानाचा महासंग्राम, बीएमसी निवडणुकीत किती झालं मतदान ? क्लिक करा अन् डिटेल्स जाणून घ्या…

manasi mande
manasi mande | Updated on: Jan 15, 2026 | 1:57 PM
Share

BMC, Pune, Nashik, Nagpur, Thane, Nashik, Kalyan Dombivli Maharashtra Election Voting Percentage 2026 LIVE Updates : राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत असून सकाळी 7.30 पासून मतदारांनी उत्साहाने रांगा लावत मतदानाचा अधिकार बजावला. राज्यभरात कुठे किती टक्के मतदान झाले हे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Election Voting Percentage 2026 LIVE :  महापालिकांच्या मतदानाचा महासंग्राम, बीएमसी निवडणुकीत किती झालं मतदान ? क्लिक करा अन् डिटेल्स जाणून घ्या...

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Jan 2026 01:57 PM (IST)

    Maharashtra Municipal Election 2026 : रश्मी ठाकरे यांनी दाखवला शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ

    राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून रश्मी ठाकरे यांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ दाखवला असून मोठी खळबळ उडाली आहे.

  • 15 Jan 2026 01:53 PM (IST)

    BMC Election 2026 Voting : लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न – उद्धव ठाकरे

    मतदारांची ओळख पुसली जात आहे का? लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न आहे. वन नेशन वन इलेक्शन मोदींना हवं आहे. काहीही करून सत्ता मिळवा हे त्यांचं मिशन आहे. आज काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं लक्षात येत आहेत. काहींची मतदान केंद्र गायब आहे. शाई पुसली जाते. ही शाई नाही, लोकशाही पुसली जात आहे. तुम्ही मार्करने करा की कशानेही करा. शाई पुसली कशी जातात. दोन नावे नोंदली तिथे हमी पत्र घेणार होते. किती हमीपत्रे घेतली. शाई पुसल्यावर मतदान करणार नाही याची काय खात्री देता असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले.

  • 15 Jan 2026 01:33 PM (IST)

    Maharashtra Election Voting Percentage : छत्रपती संभाजीनगरमध्ये किती मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क?

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. 11.30 पर्यंत 16.88 टक्के मतदान झालं.

    11 लाख 18 हजार 284 पैकी 1लाख 88 हजार 759 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर आली आहे.

  • 15 Jan 2026 01:21 PM (IST)

    Maharashtra Election Voting Percentage : अहिल्यानगर महानगरपालिकेत किती टक्के मतदान ?

    अहिल्यानगर महानगरपालिकेची आतापर्यंत टक्केवारी समोर आली असून एकूण 20.16 टक्के मतदान झालंय.

    पुरुष मतदार – 34775

    स्त्री मतदार –  27103

    इतर मतदार – 3

    एकूण मतदार – 61881

    टक्केवारी – 20.16

  • 15 Jan 2026 01:09 PM (IST)

    Nagpur Poll Percentage : किती टक्के नागपूरवासियांनी बजावला मतदानाचा अधिकार ?

    नागपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान होत असून सकाळी 11.30 वाजेपर्यंत 12% नागपूर वासियांनी मतदान केलं आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे.

  • 15 Jan 2026 01:01 PM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची टक्केवारी किती ?

    ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 11.30 पर्यंत एकूण 19 टक्के मतदान झालं आहे.

  • 15 Jan 2026 12:50 PM (IST)

    BMC Poll Percentage : बीएमसी निवडणुकीत किती झालं मतदान ?

    बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान सुरू असून सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.73 % मतदान झालं आहे.

  • 15 Jan 2026 12:43 PM (IST)

    Maharashtra Election Voting Percentage : जालना महानगरपालिका निवडणुकीची टक्केवारी किती ?

    जालना महानगरपालिका निवडणुकासाठी आज मतदान होत असून सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी  समोर आली आहे. सकाळी 11.0 पर्यंत एकूण 20.13% मतदान झालं आहे.

  • 15 Jan 2026 12:34 PM (IST)

    Jalgaon Poll Percentage : जळगाव महापालिकेच्या मतदानाची आकडेवारी किती ?

    जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक2025-26  मध्ये सकाळी 11. 30 पर्यंत मतदान किती मतदान झालंय त्याची माहिती समोर आली आहे.

    पुरुष मतदान = 33257

    स्त्री मतदान = 25441

    एकूण मतदान = 58698

    एकूण टक्केवारी = 13.39% मतदान झालं आहे.

  • 15 Jan 2026 12:31 PM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : धुळे महानगरपालिकेत किती नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क ?

    धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असून सकाळी 11.30 वाजेपर्यंतची टक्केवारी समोर आली आहे. 14.23 % मतदान झालं आहे.

    पुरुष मतदान – 33677

    महिला मतदान – 27568

    एकूण मतदान – 61259

    14.23 % मतदान

  • 15 Jan 2026 12:28 PM (IST)

    Pimpri-Chinchwad Poll Percentage : दुपारी 11.30 पर्यंत राज्यात किती झालं मतदान? पिंपरी चिंचवडची टक्केवारी समोर

    राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडत असून पिंपरी चिंचवड – महापालिकेच्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारीही समोर आली आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेत सकाळी 11:30 वाजेपर्यंत 16.03 टक्के मतदान झालं आहे.

  • 15 Jan 2026 12:20 PM (IST)

    Maharashtra Election Poll Percentage : चंद्रपूर महापालिकेत मतदानाची टक्केवारी किती ?

    चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 मध्ये आज ,सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 6.46 % इतकी होती.

  • 15 Jan 2026 12:16 PM (IST)

    Maharashtra Election Voting Percentage : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी किती ?

    जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

    पुरुष मतदान = 14494

    स्त्री मतदान = 9654

    एकूण मतदान = 24148

  • 15 Jan 2026 12:13 PM (IST)

    [Vasai Virar] Poll Percentage : वसई-विरार महापालिकेत किती झालं मतदान ?

    वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 मध्ये सकाळी 9.30 पर्यंत एकूण 8.49% मतदान झालं आहे.  मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढाना दिसत आहे.

  • 15 Jan 2026 12:04 PM (IST)

    Maharashtra Election Voting Percentage : नांदेडमध्ये सकाळी साडेनऊ पर्यंत 7.16 % मतदान

    नांदेडमध्ये  सकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत सरासरी 7.16 % मतदान झाले आहे.  एकूण 5 लाख मतदारांपैकी पहिल्या टप्प्यात दोन तासात 35 हजार 951 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या मतदानाचा महासंग्राम आज सुरू झाला असून सकाळी 7.30 पासून मतदानास सुरूवात झाली. आज संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार असून सामान्य नागिरकांसह अनेक सेलिब्रिटी, राजकारणी यांनीही मतदान केंद्र गाठून मतदानाचे कर्तव्य बजावले. यंदा बीएमसीमध्ये 227 वॉर्ड आहेत, तर सर्व महानगरपालिकांमध्ये मिळून 893 वॉर्ड आहेत. यामध्ये 2,869 समावेश आहे. महापालिका निवडणुकीत 15 हजार 908 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. राज्यभरात एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार मतदान करणार आहेत. निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी, कुठे किती मतदान झालं याचे अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिवसभर मिळतील.

Published On - Jan 15,2026 12:02 PM

Follow us
निवडणूक आयोग एवढा पगार कसला घेतात? उद्धव ठाकरेंचा संताप
निवडणूक आयोग एवढा पगार कसला घेतात? उद्धव ठाकरेंचा संताप.
मयत व्यक्तीचं नाव मतदार यादीत!BJP मंत्र्याच्याच वडिलांच नाव लिस्टमध्ये
मयत व्यक्तीचं नाव मतदार यादीत!BJP मंत्र्याच्याच वडिलांच नाव लिस्टमध्ये.
नागपूरचा गड कोण राखणार? मतदार देणार कौल
नागपूरचा गड कोण राखणार? मतदार देणार कौल.
फडणवीसांच्या 'त्या' दाव्याला काँग्रेस नेत्याचं चॅलेंज, थेट Video शेअर
फडणवीसांच्या 'त्या' दाव्याला काँग्रेस नेत्याचं चॅलेंज, थेट Video शेअर.
उमेदवाराचा आयोगानं धर्मच बदलला, EVMवर शेखर वाकोडे ऐवजी नाव शेख...
उमेदवाराचा आयोगानं धर्मच बदलला, EVMवर शेखर वाकोडे ऐवजी नाव शेख....
मुंबईकरांचं मतदान कुणाला? उज्ज्वल निकम यांची सूचक प्रतिक्रिया काय?
मुंबईकरांचं मतदान कुणाला? उज्ज्वल निकम यांची सूचक प्रतिक्रिया काय?.
राज ठाकरेंचा निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर आरोप, आता शाई नाही तर...
राज ठाकरेंचा निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर आरोप, आता शाई नाही तर....
शाई पुसली, एकाला चोप... पुण्यातील घटनेने खळबळ
शाई पुसली, एकाला चोप... पुण्यातील घटनेने खळबळ.
मतदानासाठी प्रतीक्षा, पत्नीच्या मागे राज ठाकरे, सहकुटुंब केंद्रावर...
मतदानासाठी प्रतीक्षा, पत्नीच्या मागे राज ठाकरे, सहकुटुंब केंद्रावर....
मराठी माणूस जागा झालाय, संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधूंच्या वादळामुळे..
मराठी माणूस जागा झालाय, संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधूंच्या वादळामुळे...