BMC Election 2026 Voting LIVE Updates : उत्तर प्रदेशच्या माजी राज्यपालांनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क
BMC Election 2026 Voting LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महापालिकेच बजेट हे एका राज्याच्या बजेटएवढं असतं. त्यामुळे मुंबई महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता, त्यांचा राज्याच्या राजकारणात एक दबदबा असतो. म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वाची आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
BMC Election 2026 Voting :उत्तर प्रदेशच्या माजी राज्यपालांनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क
राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबई पब्लिक स्कुल गोरेगाव पूर्व पहाडी शाळेत बजावला मतदानाचा हक्क. राम नाईक आता 92 वर्षांचे आहेत. ते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत. गोरेगाव प्रभाग क्रमांक 51 चे ते मतदार आहेत.

-
BMC Election 2026 Voting : प्रभाग क्रमांक 210 सेंट मेरी हायस्कूल मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
प्रभाग क्रमांक 210 सेंट मेरी हायस्कूल मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात. या प्रभागात उद्धव ठाकरे गटाच्या सोनम जामसुतकर, भाजपचे संतोष राणे आणि काँग्रेसमधून अनिल वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी कामावर जाण्यापूर्वी मुंबईकर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत . सकाळी 10 वाजता मनसे नेते बाळा नांदगावकर देखील याच केंद्रावर आपला मतदनाचा हक्क बजावणार आहेत.
-
-
BMC Election 2026 Voting : स्वत:चा पराजय दृष्टीपथात म्हणून फोडून काढण्याचं आव्हान
दुबार मतदान करणाऱ्यांना फोडून काढण्याच आव्हान ठाकरेंनी केलय. त्यावर अमित साटम म्हणाले की, “काही लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाहीय. स्वत:चा पराजय दृष्टीपथात दिसल्यामुळे त्यांची चलबिचल झाली आहे. त्यामुळे ते अशी बालिश आव्हान देताना दिसतायत”
-
BMC Election 2026 Voting : मुंबईकरांना काय आवाहन केलं?
“मी मुंबईकरांना आवाहन करतो की, विकसित निर्मितीच्या मुंबईसाठी, मुंबईची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी, मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार विरहीत प्रशासन देण्यासाठी महायुतीला साथ द्यावी” असं अमित साटम म्हणाले.
-
BMC Election 2026 Voting : आजचा दिवस मुंबईच्या दृष्टीने ऐतिहासिक – अमित साटम
“मुंबईकरांचे आशिर्वाद, फडणवीस साहेबांचं पाठबळ आणि केंद्रीय नेतृत्वाने दिलेले आशिर्वाद यामुळे येणाऱ्या काळात मुंबईकर भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीला आशिर्वाद देताना दिसतायत. आजचा दिवस मुंबईकरांच्या भविष्याच्या, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे” असं अमित साटम म्हणाले.
-
-
BMC Election 2026 Voting : कोविडच्या काळात मंदिर बंद करणारे आज स्वत:च्या अस्तित्वासाठी देवाकडे साकडं – अमित साटम
“मुंबईकरांना हे चांगलं माहित आहे मराठी माणसाचा, मुंबई शहराचा विकास कोणी केला? मुंबई शहराची सुरक्षितता कोण अबाधित ठेऊ शकतं.मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार सर्व भक्तांना आहे. परंतु कोविडच्या काळात मंदिर बंद करणारे आज स्वत:च्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसतायत. आज त्यांना देवदेवता आठवले, हिंदुत्व आठवलं हे चांगलं आहे” असं टीका करताना अमित साटम म्हणाले.
-
BMC Election 2026 Voting : मुंबई महापालिकेला स्वत:च्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई
“मराठी माणसाचं अस्तित्व नाही, तर मुंबई महानगरपालिकेला स्वत:च्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे त्यांची धडपड दिसत आहे. गेल्या 11 वर्षात मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने जे काम झालं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वरळी बीडीडी चाळीत 160 फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
-
-
BMC Election 2026 Voting : मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सिद्धीविनायक चरणी
सुरक्षित मुंबई निर्माण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा, आजचा हा दिवस मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून मुंबईतल्या भविष्यातल्या पिढ्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने हा दिवस ऐतिहासिक ठरो अशी सिद्धीविनायकाच्या चरणी प्रार्थना केली, असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
-
BMC Election 2026 Voting : तेजस्वी घोसाळकर मतदानापूर्वी करणार पूजा
दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपकडून घोसाळकर कुटुंबातील तेजस्वी घोसाळकर आणि वॉर्ड क्रमांक 7 मधून ठाकरे शिवसेनेकडून सौरभ घोसाळकर निवडणूक लढवत आहेत. घोसाळकर कुटुंब आज एकत्र मतदान करणार आहे. पण त्यापूर्वी ते घरी पूजा करतील.
-
BMC Election 2026 Voting Ward 153 : चेंबूरमध्ये मध्यरात्री काय घडलं? पोलिंग बूथमध्ये कोण घुसलं?
चेंबूरच्या प्रभाग 153 मध्ये स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते आणि ठाकरेंचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण. मध्यरात्री काही जण पोलिंग बूथवर बोगस आयडी घेऊन शिरल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. रविंद्र महाडीक नामक इसमाला मध्यरात्री गोवंडी पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी हा 33/44 घाटाला बीएमसी शाळेत पोलिंग बूथमध्ये घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी त्याला रात्री 1.30 वाजता रंगेहाथ पकडलं. मध्यरात्री परिसरात तणावाचे वातावरण. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. इलेक्शन आरओ सुद्धा आले होते.
-
BMC Election 2026 Voting : अक्षय कुमार किती वाजता करणार मतदान
सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा जुहू येथील गांधी शिक्षण मंडळ येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असं आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.
-
BMC Election 2026 Voting : थोड्याच वेळात मुंबईमध्ये होणार मतदानाला सुरुवात
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. थोड्याच वेळात मुंबईमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ठाकरे बंधुंसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे.
मागच्या चार वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक रखडली होती. मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती. आज 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मागची चार वर्ष प्रशासकामार्फत मुंबई महानगरपालिकेचा कारभार हाकण्यात आला. यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. ठाकरे बंधुंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून परस्परांचे स्पर्धक असलेली मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहेत. आज मतदान होत आहे. उद्या 16 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणी आहे. सर्वच पक्षांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.
Published On - Jan 15,2026 6:48 AM