AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण युद्धाने अनेकांचे जीवन नासले, कांदा-द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका, 400 विमा प्रतिनिधी अडकले, मोठी अपडेट काय?

Israel America Iran War: मध्य-पूर्व आशियातील युद्धाचे दुष्परिणाम आता जगभरात दिसून येत आहे. महाराष्ट्रावरही या युद्धाचे परिणाम समोर येत आहेत. राज्यातील अनेक जण दुबईसह आखातातील देशात अडकले आहेत. तर कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

भीषण युद्धाने अनेकांचे जीवन नासले, कांदा-द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका, 400 विमा प्रतिनिधी अडकले, मोठी अपडेट काय?
इस्त्रायल-अमेरिका इराण युद्धImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 03, 2026 | 10:09 AM
Share

Middle East War Onion-Grapes Growers: इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात मोर्चा उघडला आहे. तर सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेणी कुटुंबासह ठार झाल्यापासून इराण चवताळलेला आहे. युद्धा अजून काही महिने चालण्याची भीती वर्तवली जात आहे. या युद्धाने आखाती देशात पर्यटनासाठी, शिक्षणासाठी, कामासाठी गेलेल्या भारतीयांचा जीव धोक्यात आला आहे. इराण आखाती देशांवर मिसाईलने हल्ला चढवत असल्याने सर्वच चिंताग्रस्त झाले आहेत. ताज्या अपडेटनुसार, या युद्धाचा कांदा-द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे, तर अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे.

कांदा-द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका

आखाती देशातील युद्धाचा नाशिकच्या कांदा, द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. JNPT बंदरावर नाशिकचे कांदा, द्राक्षाचे 200 कंटेनर अडकले आहेत. निर्यातीवर युद्धाचा थेट परिणाम झाला आहे. शनिवारी रात्रीपासून दुबई बंदरावर रजिस्ट्रेशन बंद झाले आहे. JNPT बंदरात कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हजारो टन कांदा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच अडचणीत आलेले कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. निर्यात ठप्प झाल्यास बाजार भाव आणखी गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे.

बुलडाण्यातील नागरिक अडकले

मध्यपूर्व आशियात बुलढाणा जिल्ह्यातील सहा नागरिक अडकले आहेत. सायली दांडगे, रमेश उबरहंडे, गणेश उबरहंडे, बद्रीश्वर पवार, डॉ. पूजा लोखंडे, काश्मिरा शाह अशी मध्यपूर्व आशियातील विविध देशात अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तींची नावे आहे . जिल्हा प्रशासनाने या सर्वांशी संपर्क साधला असून सर्वजण सुरक्षित आहेत.. काहीही अडचण असल्यास भारतीय दूतावास सोबत संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या सर्वांची विमाने रद्द झाल्याने या सहा व्यक्ती मध्यपूर्व आशियातील विविध देशात अडकून पडल्या आहेत..

 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले

आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यतील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले आहेत. दुबई सरकारकडून अडकलेल्या भारतीयांची मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्स साठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 लोकांचा समावेश आहे. हे सर्व विमा प्रतिनिधी आज मायदेशी भारतात परतणार होते मात्र इराण-इजराईल युद्धमुळे भारतकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द झाले आहेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या सर्व लोकांना दुबईतच थांबावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या विमा प्रतिनिधीनी केली आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक