Raj Thackeray: ..आणि शाही पुसा, परत जा… दुबार मतदार सापडल्यानंतर राज ठाकरे यांचा तो मोठा आदेश

Raj Thackeray Criticized on Election Commission: मुंबई महापालिका निवडणुकीत थोड्यावेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केले.त्यांनी मतदाराच्या बोटावर शाईऐवजी मार्कर पेनने खूण करण्यात येत असल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या गोंधळावर तोंडसुख घेतले.

Raj Thackeray: ..आणि शाही पुसा, परत जा... दुबार मतदार सापडल्यानंतर राज ठाकरे यांचा तो मोठा आदेश
राज ठाकरे, निवडणूक आयोग
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 15, 2026 | 12:09 PM

Raj Thackeray Criticized on Election Commission: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केले. या निवडणुकीत मार्कर पेनच्या वापरामुळे बोटावरील खूण पुसली जात असून दुबार मतदानाचा प्रयत्न होत असल्याचे प्रकार समोर आले, त्यावरमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतले. त्यांनी PADU या मशीनबाबत पुन्हा आक्षेप नोंदवला आहे. सत्ताधाऱ्यां

निवडणूक आयोगाला काढले सोलपटून

Live

Municipal Election 2026

04:19 PM

Nagarsevak Election 2026 : मतदानानंतर व्हिडीओ काढणाऱ्यांनो सावधान...

04:17 PM

Maharashtra Municipal Election 2026 : धुळे महानगरपालिकेच्या अवधान गावातील मतदान केंद्रात प्रचंड मोठी गर्दी.

03:53 PM

पराभवाच्या मानसिकतेतून ठाकरे गटाची पत्रकार परिषद, राहुल शेवाळे यांचा आरोप

03:00 PM

शाई पुसली जात असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

04:10 PM

Thane Poll Percentage : ठाणे महानगरपालिका निवडणूकीसाठी 1.30 वाजेपर्यंत 30.75 टक्के मतदान

03:59 PM

Jalgaon Poll Percentage : जळगाव महानगरपालिकेसाठी दुपारी 1.30 पर्यंत केवळ 22.49% मतदान

ऐनकेनप्रकारे निवडणुका जिंकायच्या यासाठी सरकार आणि प्रशासन काम करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. दुबार मतदारांचा विषय आला. VVPAT चा वापर करणारच नाही, आता नवीन त्यांनी PADU हे यंत्र आणले, ते मतदान मोजणीच्या वेळी वापरले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्ष नावाची गोष्ट ठेवायचीच नाही. विरोधकांना ठेवायचंच नाही.सरकारनं ठरवायचं की निवडणुका कशा जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेला केलं, तेच आता करायचा प्रयत्न होत आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. आम्ही तो होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

पाडू हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही. याविषयीची कोणतीच स्पष्टता निवडणूक आयोगाने दिलेली नाही. मागितल्यानंतर, पत्र पाठविल्यावरही ही माहिती ते देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. काल अचानक एक दिवस मतदारांना भेटण्यासाठी वाढवून दिला असला कुठलाही नियम नाही.हा नियम अचानक आणला. हा नियम पैसे वाटण्यासाठी आणला. संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागले आहे. ही चांगल्या लोकशाहीची लक्षणं नाहीत.या असल्या फ्रॉड निवडणुकांआधारे सत्तेवर येणं, याला काही सत्ता नाही म्हणतं.मनसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी सर्वच ठिकाणी सतर्क राहावे असे राज ठाकरे म्हणाले.

हा कसला विकास?

आज तर निवडणूक आयोगाने नवीच काही आणलंय. या अगोदर मतदाराच्या बोटाला शाई लावली जायची आता ते पेनचा वापर करत आहेत. याविषयीच्या इतक्या तक्रारी समोर येत आहेत की तुम्ही त्या बोटाला सॅनिटायझर लावले तर ती शाई पुसली जात आहे. महाराष्ट्र सैनिकांनी या सर्व प्रकारावर लक्ष ठेवावं. कोण दुबार येतंय. कोण शाई पुसून येत आहे, यावर लक्ष ठेवावं असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
तर यावेळी शाई पुसा आणि परता जा, पुन्हा मतदान करा हा त्यांचा विकास असल्याची जहरी टीका राज ठाकरे यांनी भाजपवर केली. माध्यमांनी सुद्धा अशा प्रकारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.