
“गेली अनेक वर्ष अशा याद्या शिवसेनेतर्फे जाहीर केल्या जात नाहीत. ज्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांना एबी फॉर्म दिला जातो. ते तुम्हाला कळेलच. उमेदवारी दिली हे लपून राहत नाही. याद्या जाहीर करायच्या. मग, यादीतून गोंधळ व्हायचा. हे प्रकार सर्वपक्षांनी थांबवले आहेत. काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना एबी फॉर्म दिले. त्यांनी वाजत-गाजत अर्ज भरलेले आहेत. मनसेच्या उमेदवारांनी सुद्धा उत्साहात अर्ज भरले आहेत” असं खासदार संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे गटाने बंडखोरीची भिती असल्याने उमेदवार यादी जाहीर केली नाही. त्यावर संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं. “इतर पक्षात काय गोंधळ चाललेला हे आपण पाहिलेलं आहे. 14 महानगरपालिकांमध्ये महायुती तुटलेली आहे. अनेक शहरात महायुतीचे लोक ऐकमेकाच्या छाताडावर बसलेले” असं संजय राऊत म्हणाले.
“शिस्तबद्ध भाजपच्या तिकीट वाटपात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला ते सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं. बाहेरुन आलेल्या गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केलं. ही लोकशाही आहे. गुंडांची रीघ लागलेली आहे. रीघ लागलीय ती पैसे घेण्यासाठी उमेदवारी बरोबर मिळणाऱ्या पाच कोटीसाठी. शिंदेंकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी दिले जातायत” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
निष्ठा पैशाच्या पावसाचा वाहून गेल्या
“कोणी निष्ठावंत नसतात. निष्ठावंतांची काल भूमिका तुम्ही पाहिली असेल. शिंदेगट, भाजप आणि अजित पवार गट उमेदवारी अर्जाबरोबर आर्थिक पॅकेज देतोय त्यासाठी हा गोंधळ सुरु आहे. निष्ठा पैशाच्या पावसाचा वाहून गेल्या आहेत.
तुमची निष्ठा तिकीटावर आहे की पक्षावर
अनिल कोकीळ आणि प्रिती पाटणकर यांनी बंडखोरी केली. त्यावर सुद्धा राऊत बोलले. “हे बंड वैगेरे काही नसतं. याला कसलं बंड म्हणता. एका पक्षात तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायच. याला बंड म्हणायचं का?. या देशात बंड एकच झालं 1857 साली. ब्रिटिशांविरुद्ध, स्वातंत्र्यासाठी, विचारांसाठी झालेलं बंड होतं. तिकीटांसाठी बंड होतात. तुमची निष्ठा तिकीटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. ज्यांची तिकीटावर निष्ठा आहे ते निघून गेले. तिकीट नाकारल्यानंतर दुसऱ्या मिनिटात दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घेता याचा अर्थ 10 दिवसापासून तू त्यांच्या संपर्कात होतास. त्यांना परत बोलवणार नाही” असं राऊत यांनी सांगितलं.
याचा अर्थ तुम्ही त्यांच्या संपर्कात होता
“यांना बंडखोर कसं म्हणायचं, यांना बेईमान म्हटलं पाहिजे. दोन-दोन, तीन-तीन वेळा तुम्ही नगरसेवक आहात. पक्षाच्या तिकीटावर इतर कोणाला, तरुणांना संधी द्यायची नाही का?. पक्षात लोक वर्षानुवर्ष काम करतायत. काही ठिकाणी संधी असेल तर दिली पाहिजे. शिवडीचा उल्लेख केला. कोकीळांना दुसऱ्या मिनिटाला उमेदवारी मिळते, याचा अर्थ तुम्ही त्यांच्या संपर्कात होता” असं संजय राऊत म्हणाले.