AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच मतदारांचा महापूर; मलाड कुर्ल्यात मोठी लाट, दक्षिण मुंबईत टक्का घसरला

Malad Kurla Voter Increased: मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मोठी अपडेट येऊन धडकली आहे. काही भागात मतदारांचा महापूर आल्याचे समोर आले आहे. तर काही भागात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरल्याचे नवीन आकेडवारीवरून समोर आले आहे.

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच मतदारांचा महापूर; मलाड कुर्ल्यात मोठी लाट, दक्षिण मुंबईत टक्का घसरला
मुंबई महापालिका निवडणूक मतदारांची संख्या वाढली
| Updated on: Dec 07, 2025 | 2:07 PM
Share

Mumbai Municipal Corporation Elections: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ अजूनही संपलेला नसल्याचे दिसते. शहरातील 227 प्रभागातील मतदारांच्या संख्येत एकूण 12.67 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील काही भागात मतदारांचा महापूर आला आहे. तर काही भागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. पश्चिमी आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काही जुन्या भागात मतदारांच्या संख्येत घट आली आहे. प्रारुप मतदार यादीतून हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2017 नंतर मुंबईतील मतदारांच्या संख्येत एकूण 12.67 टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात प्रत्येक प्रभागात यामध्ये बदल दिसला. 227 प्रभागात वेगवेगळा ट्रेंड दिसला.

मलाड आणि कुर्लामध्ये मतदार वाढले

प्रारुप मतदार यादीनुसार, सर्वात मोठा बदल हा पश्चिमी उपनगरांमध्ये दिसून आला. मलाड-मालवणी या भागात आणि मध्य मुंबईच्या कुर्ला परिसरात मोठा बदल दिसला. पी नॉर्थ बेल्डच्या प्रभाग क्रमांक 48, 33, 163 आणि 157 मतदारांच्या संख्येत 50 टक्क्यांची वाढ झाली. या प्रभात मुख्यतः कामगार आणि अल्पसंख्यांक समुदायाची लोकसंख्या अधिक आहे. या नवीन मतदारांवर राजकीय पक्ष आणि प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. सर्वाधिक मतदार वाढ झालेल्या टॉप-5 प्रभागातील तीन पी उत्तरी भागात आहेत.

24 प्रभागात मतदारांची संख्या घटली

तर दक्षिण मुंबईत चित्र मात्र उलटे आहे. जुन्या प्रभागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण दिसून आली. एकूण 24 प्रभागात मतदारांची संख्या कमी झाली आहे. यामध्ये 10 उपनगरांचा पण समावेश आहे. कळबादेवी आणि चीरा बाजार येथील लोक इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. कारण या भागातील अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे यापरिसरातील अनेक लोक बाहेर गेले आहेत.

बदलाची कारणं काय?

प्रशासकीय स्तरावर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आल्याने बोगस मतदारांची आकडेवारी समोर आली आहे. बीएमसी आणि निवडणूक आयोगाने जवळपास 11 लाख दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून कमी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मतदार जोडणी, अंतर्गत स्थलांतरण आणि नवीन मतदारांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!.
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर.
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू.
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू.
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना.
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.