मुंबई महापालिकेचे 15 दवाखाने आता रात्रीही खुले राहणार, स्थायी समितीची मंजुरी

| Updated on: Dec 09, 2019 | 7:34 PM

मुंबई महापालिकेचे दवाखाने आता रात्रीही खुले ठेवण्यात येणार (BMC Clinic Open in night) आहे. नुकतंच याबाबचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे.

मुंबई महापालिकेचे 15 दवाखाने आता रात्रीही खुले राहणार, स्थायी समितीची मंजुरी
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेचे दवाखाने आता रात्रीही खुले ठेवण्यात येणार (BMC Clinic Open in night) आहे. नुकतंच स्थायी समितीने या प्रस्तावला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला (BMC Clinic Open in night) आहे. यानुसार आता मुंबईत 15 दवाखाने रात्री सुद्धा सुरु राहणार आहेत. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार असून मोठ्या रुग्णालयावरील भार कमी होणार (BMC Clinic Open in night) आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यात स्वस्त आणि चांगले उपचार होतात. यामुळे पालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यातच संध्याकाळी पालिकेचे दवाखाने बंद होत असल्याने अनेक रुग्ण मोठ्या रुग्णालयांकडे धाव घेतात. त्यामुळे मोठ्या रुग्णालयावरील भार वाढतो.

मोठ्या रुग्णालयांवरील भार कमी करता यावा म्हणून पालिकेचे 15 महत्त्वाचे दवाखाने दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. नुकतंच याबाबचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला (BMC Clinic Open in night) आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना आता उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही.

दवाखान्यांची नावे 

  • ए विभाग – कुलाबा म्युनिसिपल दवाखाना
  • बी विभाग –  वालपाखाडी दवाखाना
  • डी विभाग – बाने कंपाऊंड दवाखाना
  • ई विभाग – साऊटर स्ट्रीट दवाखाना
  • एफ/नॉर्थ – रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना
  • जी/साऊथ – बीडीडी चाळ दवाखाना
  • एच/ईस्ट – कलिना दवाखाना
  • एच/वेस्ट – ओल्ड खार दवाखाना
  • के/वेस्ट – एन. जे. वाडिया दवाखाना
  • पी/नॉर्थ – चौक्सी दवाखाना
  • आर सेंट्रल – गोराई म्हाडा दवाखाना
  • एल विभाग – चुनाभट्टी दवाखाना
  • एन विभाग – रमाबाई आंबेडकर दवाखाना
  • एस विभाग कांजूर व्हिलेज दवाखाना