गोरेगावात शौचालयात दोन तरुणाचे मृतदेह सापडले, विषारी वायूने मृत्यू ?
मुंबईतील उपनगरातील गोरेगावात एका सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांना विषारी वायूने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गोरेगाव पूर्वेकडील राम मंदिर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे गुदमरुन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुण बराच वेळ शौचालयातून बाहेर पडले नाहीत,त्यामुळे दरवाजाचे तोडले असताना दोघे मृतावस्थेत आढळले. या प्रकरणाने झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयातील दुर्घटनात आणखी एका दुर्घटनेची भर पडली आहे. मुंबईत यापूर्वी काही वर्षांपूर्वी मानखुर्द परिसरात सार्वजनिक शौचालयात एकाचा मृत्यू झाला होता.
मुंबईतील गोरेगाव पूर्व राम मंदिर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात उग्र वायूच्या वासाने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणांचा मृत्यू गुदरमल्याने झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, मृत्यू नेमकी कोणती घटना जबाबदार आहे हे कळू शकलेले नाही. केमिकलच्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचे काही जणांनी म्हटले असले तरी पोस्टमार्टेम अहवाल आल्यानंतरचे नेमका मृत्यू कसा झाला याची माहिती उघड होईल असे म्हटले जात आहे.
ज्या ठिकाणी दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला, ते हेच सार्वजनिक शौचालय आहे आणि बाजूला हे जे झोपडं दिसत आहे, याच झोपड्याच्या आत ती कंपनी आहे, जिथे केमिकलचा वापर केला जात होता. या शौचालयाच्या बाजूलाच असलेल्या याच गटारात ते केमिकल टाकण्यात आले होते, ज्याच्या उग्र वासामुळे आधी येथे एका मांजरीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर भाविक देसाई आणि प्रभाकर धीवार नावाच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला.दरम्यान या घटनेनंतर वनराई पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.