
निखिल चव्हाण : “भारतातील हायस्पीड ट्रेन साठी काम करणाऱ्या सर्व लोकांचे अभिनंदन आणि स्वागत आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही या ठिकाणी हे काम करत आहात. आज सेकंड माउंटेन टनलच ब्रेक थू या ठिकाणी झालं. गेल्या महिन्यात पहिलं ब्रेक थ्रू झालं. त्यानंतर आता दुसरा ब्रेक या ठिकाणी होत आहे. बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून स्टेशन्स सर्वच ठिकाणी ऍडव्हान्स आहेत. ब्रिज ऍडव्हान्स या ठिकाणी होत आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचं सरकार होतं. त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नाही आणि रोखून ठेवली त्यामुळे खूप डिले झालेला आहे” असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
“सरकार चेंज झालं आणि या प्रकल्पाला गती मिळालेली आहे. पंतप्रधान आणि वित्तमंत्री यांना धन्यवाद. हाय स्पीड कॉरिडोर बजेटमध्ये अनाउन्स केलेला आहे. दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते पटना, सिलिगुडी. मुंबई सबर्बन साठी खूप मोठं काम चालू आहे. 16000 कोटी रुपयांचा काम सुरू आहे. मुंबईतील थर्ड लाईन, फोर लाईन त्यासोबतच प्लॅटफॉर्म वाढवणे, त्याचं सुशोभीकरण करणे, त्याचा काया पालट करणे ही सर्व कामं या ठिकाणी मुंबईत सुरू आहेत” असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
ते देशाला ईस्ट-वेस्ट जोडणार आहेत
“पंतप्रधानांनी रेकॉर्ड म्हणजेच 23 हजार 900 कोटी रुपयांचं बजेट या ठिकाणी नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे. त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद हे बजेट जे दिलेलं आहे ते काँग्रेसच्या सरकार पेक्षा 20% जास्त आहे” असं अश्विनी वैष्णव म्हणाले. “ईस्ट-वेस्ट जे कॉरिडोर आपण करत आहोत ते देशाला ईस्ट-वेस्ट जोडणार आहेत. महाराष्ट्रातील वाढवन बंदरापर्यंत पर्यंत याची मार्गिका असणार आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत जिल्हे आहेत. या जिल्ह्यांना देखील जोडण्याचं काम करण्यात येणार आहे. गुजरातचे देखील रेल्वे बजेट सर्वात जास्त आहे. त्यामुळे ईस्ट वेस्ट कॉरिडोर बनत आहे” असं अश्विनी वैष्णव म्हणाले.
ठाण्यापर्यंत बुलेट ट्रेनचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल?
“पश्चिम बंगालचं सरकार विरोधी सरकार आहे. त्यामुळे जे मोठे काही प्रोजेक्ट असेल त्याला ते विरोध करतात. कोलकाता मेट्रोला देखील त्यांनी विरोध केला. गेल्या 40 वर्षांमध्ये 25 किलोमीटरचा काम झालेलं होतं. गेल्या 11 वर्षात 45 किलोमीटरचं काम झालेलं आहे. परंतु राज्य सरकारची मदत न मिळाल्यामुळे परवानगी मिळत नाही आहे. मेट्रो प्रोजेक्ट झाले असते तर त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना मोठी मदत झाली असती. पण ते करून देत नाहीत. परंतु आम्ही थांबणार नाही हे काम पूर्ण केल्याशिवाय. 2028 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम ठाण्यापर्यंत पूर्ण होईल आणि 2029 पर्यंत पूर्ण मुंबईपर्यंत बुलेट ट्रेन धावू शकणार आहे” असा अश्विनी वैष्णव यांनी दावा केला.
किती काम पूर्ण झालय?
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोर 508 किलोमीटर मार्ग आहे. पश्चिम भारतात महाराष्ट्र आणि गुजरात राज्या दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी. एकूण 508 किमी पैकी 334 किमी व्हायाडक्ट आणि 417 किमी काम पूर्ण झाले आहे. 17 नदी पूल, 05 पीएससी (प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट) पूल आणि 13 स्टील पूल पूर्ण झाले आहेत. 247 किमी लांबीच्या मार्गावर 4.9 लाखांहून अधिक नॉईज बेरिअर्स बसविण्यात आले आहेत. 308 ट्रॅक किमी (154 रूट किमी) आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मुख्य मार्गावरील व्हायाडक्टच्या सुमारे 125 रूट किमी क्षेत्रात 5400 हून अधिक ओएचई मस्त उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सात (07) पर्वतीय बोगद्यांपैकी पहिल्या पर्वतीय बोगद्याचे ब्रेकथ्रू पूर्ण झाले आहे. आठ पर्वतीय बोगद्यांपैकी दोन बोगद्यांचे उत्खनन काम पूर्ण झाले आहे.