AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोली रिकामी करायची आहे, पॅकिंगला ये सांगत तिला बोलावलं अन्… तिथे नेमकं काय घडलं ?

औरंगाबादेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या विद्यार्थिनीला आरोपीने सामान पॅक करण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोली रिकामी करायची आहे, पॅकिंगला ये सांगत तिला बोलावलं अन्... तिथे नेमकं काय घडलं ?
| Updated on: Aug 05, 2026 | 2:01 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये 31 वर्षीय पीएचडी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, सामान पॅक करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला घरी बोलावून माझ्यावर अत्याचार करण्यात आला, अशी तक्रार पीडितेने पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दीपक मधुकर भुक्तार (वय 35, रा. घाटी क्वार्टर, सध्या रा. पडेगाव) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीची सुमारे दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. या ओळखीच्या आधारे आरोपीने विद्यार्थिनीचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावलं

आरोपी घाटी परिसरातील शासकीय क्वार्टरमध्ये राहत होता. खोली रिकामी करायची असल्याचे सांगत त्याने पीडित विद्यार्थिनीला 8 जुलै रोजी सामान पॅक करण्यासाठी मदतीसाठी बोलावलं. काम उशिरापर्यंत सुरू राहिल्याने त्या रात्री ती तेथेच थांबली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर 12 जुलै रोजी उर्वरित सामान पॅक करण्यासाठी आरोपीने पुन्हा विद्यार्थिनीला घरी बोलावलं. याच दिवशी रात्री आरोपीने तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

बळजबरीने गोळी खाऊ घातल्याचाही आरोप

पीडितेच्या तक्रारीनुसार, दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जुलै रोजी सकाळी आरोपीने तिला बळजबरीने एक गोळी खाण्यास भाग पाडले. त्यानंतर समतानगर येथील तिच्या राहत्या खोलीवर सोडल्याचाही आरोप तिने केला आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

आरोपी अटकेत, तपास सुरू

पीडितेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात घटनेतील सर्व बाबींचा तपास केला जात असून, आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?