जंतर मंतरनंतर E20 इंधनावरून घमासान! पेट्रोलच्या मुद्दावर CJP पण मैदानात?
E20 Ethanol Cockroach Janta Party: ई 20 प्रकरणी वातावरण तापलेले आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणि इतर संघटनांनी अगोदरच याविषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉक्रोच जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात हा मुद्या ऐरणीवर असल्याचे समोर आले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने (CJP)जंतर मंतरवर आंदोलन केले. त्यानंतर हा पक्ष ई20 इथेनॉल मिश्रीत आंदोलनात उडी घेण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात अभिजीत दिपके यांचे घर आहे. येथे पक्षाची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवर विचारमंथन होणार आहे. तर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे. बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्था या मुद्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी दिल्लीसह देशातील काही पदाधिकारी उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक जण राजकीय पक्ष स्थापन करण्याची मागणी करत आहे. पण देशात नवीन पक्षाची नाही तर एका लोक आंदोलनाची, दबावगटाची गरज असल्याचे दिपके म्हणाले. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले आहे. त्याला दिपके यांनी पाठिंबा दिला आहे. तर झारखंडमध्ये जाण्याची घोषणा त्यांनी केली. तिथे विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
झारखंडमधील आंदोलात उतरणार
झारखंडमध्ये विद्यार्थी परीक्षेतील घोळाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला सीजेपीने पाठिंबा जाहीर केला आहे. आपल्या पक्षातील काही नेते आणि पदाधिकारी या आंदोलनात अगोदरच सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी या आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. तर गरज पडल्यास या आंदोलनात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. झारखंडमधील विद्यार्थ्यांशी फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली आहे. सीजीपीने त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.
ई-20 इथेनॉल पेट्रोल
जंतरमंतर नंतर ई-20 इथेनॉल पेट्रोलवर दिल्लीत मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे. सीजेपी संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सांगितले की, दोन दिवसीय बैठकीत इथेनॉल पेट्रोल आणि बेरोजगारी या विषयावर चर्चा होणार आहे. यामुळे हा विषय सुद्धा त्यांच्या अजेंड्यावर असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले. सीजेपी हा राजकीय पक्ष नाही तर दबाव गट म्हणून काम करेल असे त्यांनी स्पष्ट केले. सीजेपीचे प्रवक्ते आणि काही सदस्य सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत.
ई20 मुळे जनता त्रस्त
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, अरविंद केजरीवाल यांनी सरकारव निशाणा साधला. ई20 इंधनामुळे देशातील सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ई20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे. वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. सरकार कोणत्याही ठोस माहितीशिवाय हे इंधन जनतेवर लादत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. देशातील 2.33 लाख नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहिमही त्यांनी राबवली. काल त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चाची घोषणा केली होती.
