AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DUSU Election Result 2026 : दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत एबीव्हीपीचा डंका; अध्यक्ष, सचिवपदावर विजय; नेमका निकाल काय?

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत एबीव्हीपीचा डंका पाहायला मिळाला. या निवडणुकत एबीव्हीपीने अध्यक्ष, सचिवपदावर विजय मिळवला.

DUSU Election Result 2026 : दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत एबीव्हीपीचा डंका; अध्यक्ष, सचिवपदावर विजय; नेमका निकाल काय?
ABVPImage Credit source: ABVP
| Updated on: Sep 19, 2026 | 7:05 PM
Share

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत एबीव्हीपीचा डंका पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत एबीव्हीपीने अध्यक्ष, सचिव, सहसचिव जागांवर बाजी मारली आहे. तर उपाध्यक्ष पदाच्या एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत एबीव्हीपी आणि एनएसयूआयमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत अपक्ष आणि समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनेही नशीब आजमावलं. एबीव्हीपीच्या यश दबासने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या सचिव पदावर एबीव्हीपीच्या रिया छाबरीने विजय मिळवला. सहसचिवपदावर लक्ष्यराज चौधरी याने विजय मिळवला. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवार दीपांशु शौकीनचा विजय झाला. दिल्ली विद्यापीठात शुक्रवारी विद्यार्थी संघटनेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 40.46 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेस-प्रणित NSUI यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत एबीव्हीपीने बाजी मारली.

दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीच्या निकालाचा अर्थ काय?

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीकडे संपूर्ण भारताचं लक्ष असते. दिल्ली विद्यापीठाला ‘मिनी-इंडिया’ मानले जाते. दिल्ली विद्यापीठ हे देशातील मुख्य प्रवाहातील विद्यापीठापैकी एक आहे. या निवडणुकीत विजय मिळवून एबीव्हीपीने मोठा संदेश दिला आहे. या निवडणुकीत दिसत आहे की, तरुण वर्ग हा राष्ट्रवादाच्या मुल्यांशी जोडला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेने निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यांनी निवडणुकीत तरुणांशी दिशाभूल आणि चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. परंतु या निवडणुकीत एबीव्हीपीने डंका मारला. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची जादू या निवडणुकीत चालली नाही. एकेकाळी दिल्ली विद्यापीठावर वर्चस्व गाजवणारी काँग्रेस-प्रणित विद्यार्थी संघटना शून्यावर पोहोचली. तरुणांनी काँग्रेस (Congress) -प्रणित विद्यार्थी संघटनेला डावलल्याचे दिसत आहे. तरुण काँग्रेसच्या राजकारणाच्या शैलीच्या विरोधात आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या काही कॉलेजमध्ये एबीव्हीपीने चांगली कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी