AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीजी, मिसाइल द्या… आम्ही पाकिस्तानला उडवतो, महिला युट्यूबरकडे तालिबान्यांची मागणी; पुढे काय घडलं?

भारतीय यूट्यूबर अंकिता कुमार यांना अफगाणिस्तान दौऱ्यात धक्कादायक अनुभव आला. तालिबान सदस्यांनी त्यांना सांगितले, "पंतप्रधान मोदींनी क्षेपणास्त्रे दिल्यास आम्ही पाकिस्तानला उडवून टाकू." या घटनेतून अफगाणिस्तानातील भारताप्रती प्रेम आणि पाकिस्तानबद्दलचा द्वेष स्पष्ट दिसतो.

मोदीजी, मिसाइल द्या... आम्ही पाकिस्तानला उडवतो, महिला युट्यूबरकडे तालिबान्यांची मागणी; पुढे काय घडलं?
narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 5:58 PM
Share

अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे काबुल आणि इस्लामाबादचे संबंध बिघडले आहेत. काही महिन्यांपूर्वी तर तालिबान आणि पाकिस्तानच्या सैन्याची सीमेवर धुमश्चक्री उडाली होती. दोन्हीकडून जोरदार गोळीबार झाला आणि त्यामुळे दोन्हीकडच्या सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. ऑगस्ट 2021मध्ये काबुलमध्ये तालिबानचं पुनरागमन झालं. त्यामुळे अफगाणिस्तानचं राजकारण ऐंशी कोनात बदलून गेलं आहे. त्यामुळेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं मैत्रीपर्व ही आता अख्यायिका झाल्यासारखं झालं आहे. दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू झाले आहेत. तर अफगाणिस्तानमध्ये भारताचं जोरदार समर्थन केलं जात आहे.

भारतातील एक महिला ब्लॉगर अफगाणिस्तानात गेली होती. त्यावेळी तिला तिथल्या नागरिकांमध्ये भारताबाबतचं प्रेम पाहून ती अवाक् झाली. अफगाणिस्तानचे नागरिक भारताबाबत भरभरून बोलत होते. या बोलण्यात मायेचा ओलावा होता. या महिलेने अफगाणिस्तानातील हे अनुभव शेअर केले आहेत. अफगाणिस्तानचे नागरिक कशा पद्धतीने भारताकडे मैत्रीच्या दृष्टीकोणातून पाहत आहेत आणि पाकिस्तान त्यांच्यासाठी नंबर एकचा शत्रू कसा आहे, याची माहितीही या महिलेने दिली आहे.

तालिबानी बंडखोर काय म्हणाले?

अंकिता कुमार असं या महिलेचं नाव आहे. त्या ब्लॉगर, ट्रॅव्हलर आणि युट्यूबर आहेत. त्यांनी पॉडकास्टमध्ये आपला अनुभव शेअर केलाय. तालिबानी सदस्यांसोबत त्यांची भेट झाली होती. त्यावेळी एका सदस्याने त्यांना म्हटलं की, जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला मिसाइल दिल्या तर आम्ही पाकिस्तानला उडवून टाकू. तालिबानी सदस्याचे शब्द ऐकताच अंकिता यांना धक्काच बसल्या. कारण त्या जिओपॉलिटिक्सवर चर्चा करत होत्या. आणि अचानक त्यांना समोरून असं उत्तर आलं. त्यामुळे त्या आवाक् झाल्या.

काहीच त्रास नाही

तालिबानी सदस्यांसोबत मी अत्यंत आरामात होते. महिला असल्यामुळे तालिबानी सदस्यांनी मला चुकूनही स्पर्श केला नाही. उलट मी जेव्हा कॅमेरा काढायचे तेव्हा ते तोंड लपवायचे, असं अंकिता यांनी म्हटलंय. पण कंदाहारमध्ये अधिक काळ थांबले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कंदाहारमध्ये महिलांसाठी अत्यंत कडक नियम आहेत. गाडीत पुढे जागा असूनही मला पाठी डिक्कीत बसावं लागलं होतं, असं अंकिता म्हणाल्या.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी