AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देसी ब्लिंग’ फेम सतीश सनपालची सर्व बँक खाती गोठवली; 40 किलो सोनं असल्याचा पत्नीचा दावा

'देसी ब्लिंग' या शोमध्ये आपली संपत्ती आणि ऐशोआरामाचा बडेजाव करणारे सतीश सनपाल आणि तबिंदा सनपाल यांची सर्व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. या शोमध्ये तंबिदाने तिच्याकडे तब्बल 40 किलो असल्याचा दावा केला होता.

'देसी ब्लिंग' फेम सतीश सनपालची सर्व बँक खाती गोठवली; 40 किलो सोनं असल्याचा पत्नीचा दावा
Satish Sanpal and TabindaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2026 | 1:56 PM
Share

नेटफ्लिक्सवरील ‘देसी ब्लिंग’ या रिअॅलिटी शोमधून अत्यंत आलिशान लाइफस्टाइलचं प्रदर्शन करणारे प्रसिद्ध उद्योगपती सतीश सनपाल यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीची मनी लाँडरिंगविरोधी संस्था ‘फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट’ने (FIU) सतीश सनपाल आणि त्यांची पत्नी तबिंदा सनपाल यांची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या हाय-प्रोफाइल जोडप्याशी संबंधित कंपन्यांच्या मालमत्तेवर तात्पुरती ही कारवाई करण्यात आली आहे. हा आदेश 30 दिवसांसाठी लागू राहील, त्यानंतर गरज भासल्यास एफआययू मुदतवाढीची मागणी करू शकते. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये किराणा दुकान चालवणाऱ्या सतीश सनपाल यांनी दुबईत जाऊन तब्बल 3 अब्ज डॉलर्सची ‘अनॅक्स होल्डिंग’ ही कंपनी उभारली होती. ‘देसी ब्लिंग’ या शोमध्ये दोघांनी त्यांच्या श्रीमंतचं प्रदर्शन केलं होतं. “माझ्याकडे 40 किलो सोनं आहे. सतीशला सोनं खरेदी करायला खूप आवडतं. दरवर्षी धनत्रयोदशीला तो मला सुमारे 3 किलो सोनं देतो”, असं तबिंदाने शोमध्ये म्हटलं होतं.

संयुक्त अरब अमिरातीमधील अधिकाऱ्यांनी मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून सनपाल यांची मालमत्ता गोठवली आहे. नोटीसमध्ये अनॅक्स कॅपिटल असेट मॅनेजमेंट कंपनी, अनॅक्स कॅपिटल फायनान्शियल मार्केट एलएलसी, अनॅक्स होल्डिंग एफझेडसीओ आणि एसएसबी बाजार जनरल ट्रेंडिंग एलएलसी यांचा समावेश आहे. मोल्यवान रत्नांचा व्यवसाय करणारी एसएसबी ही कंपनी 2015 मध्ये स्थापन झाली होती. तर इतर तीन संस्थांची स्थापना 2023 ते 2024 दरम्यान झाली.

‘देसी ब्लिंग’ या शोमध्ये आपली श्रीमंती आणि आलिशान लाइफस्टाइलचं प्रदर्शन करताना हे सर्व अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मिळवण्याला दावा सनपाल यांनी केला होता. 41 वर्षीय सतीश सनपाल यांनी आठवी इयत्तेनंतर शाळा सोडली आणि वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी बिझनेसमध्ये प्रवेश केला. आईकडून 50 हजार रुपयांचं कर्ज घेऊन त्याने एक छोटं किराणा दुकान सुरू केलं होतं. मात्र हे दुकान फार काळ चाललं नाही म्हणून अखेर ते बंद करावं लागलं. जवळपास 11 वर्षांपूर्वी सतीश युएईमध्ये स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी ग्राहकांना शेअर बाजारातील दलालांशी संपर्क साधून देण्यास मदत केली. नंतर त्यांनी तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमधील व्यवसायांमध्ये विस्तार केला. दुबईतील बुर्ज खलिफामधील भव्य अपार्टमेंट, रोल्स रॉइससह आलिशान गाड्यांचं मोठं कलेक्शन.. या सर्वांची झलक त्यांनी ‘देसी ब्लिंग’मध्ये दाखवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सनपाल यांच्यावर मध्य प्रदेशात नऊ फौजदारी खटले दाखल आहेत. 2022 मध्ये त्यांच्याविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तरी त्यांच्यावर दाखल झालेल्या एकाही खटल्यात त्यांना दोषी ठरवण्यात आलं नाही. “सतीश सनपाल यांनी 2020 पासून भारतात प्रवास केला नाही. या खटल्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही. एका प्रकरणात सह आरोपींची आधीच निर्दोष मुक्तता झाली आहे”, असं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय.

Follow Us
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती