AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy : काल सुनेत्रा पवार गुंगी गुडिया, आज काँग्रेसची आश्चर्यकारक भूमिका, हर्षवर्धन सपकाळ झटक्यात बदलले

Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy :राज्यभरात काँग्रेस विरोधात आंदोलनं सुरु आहेत. सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टिप्पणीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. कालपर्यंत हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या भूमिकेवर ठाम होते.

Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy : काल सुनेत्रा पवार गुंगी गुडिया, आज काँग्रेसची आश्चर्यकारक भूमिका, हर्षवर्धन सपकाळ झटक्यात बदलले
Harshwardhan Sapkal
| Updated on: Aug 05, 2026 | 2:07 PM
Share

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. चहूबाजूंनी काँग्रेसवर टीका सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जाऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभरात काँग्रेस विरोधात आंदोलनं सुरु आहेत. सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टिप्पणीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. कालपर्यंत हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या भूमिकेवर ठाम होते. आज मात्र त्यांची भूमिका बदलली आहे.

“या संदर्भात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जे काही चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. स्त्रीदाक्षिण्य आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे. एका प्रसंगाच्या अनुषंगाने केलेली टिप्पणी व्यक्तीगत घेऊन विपर्यास करु नये. काँग्रेसकडून खेद व्यक्त करणारं टि्वट करण्यात आलय. हा अनावश्यक मुद्दा आहे. यावर अधिक बोलणं उचित नाही” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. “काल आमची भूमिका सांगतली. कुठलाही विपर्यास करु नये. या संदर्भात पक्षाने एक सभ्य, सुस्कृंतपणाची भूमिका घेतली आहे” असं ते बोलले. राहुल गांधींना संजय काकडे यांनी पत्र लिहिलय त्यावर सपकाळ म्हणाले की, “ते ठीक आहे, कोणी कोणाला पत्र लिहू शकतं. आम्ही आमची भूमिका सविस्तर मांडली आहे. आम्हीच खरे निष्ठावंत आहोत हे दाखवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात बरेच लोक बऱ्याच गोष्टी करत आहेत. यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही”

म्हणून ते आम्हाला केविलवाणा डोस पाजण्याच प्रयत्न करतायत

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यातून काँग्रेसची संस्कृती दिसली. “जे वक्तव्य आमच्या आमच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या विभागाने केलय, ते टि्वट केलं. ते काँग्रेस पक्षाचं विधान नव्हतं. रोम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधीं संदर्भात जो एक कोट वापरला होता. तोच कोट आमच्या विभागाने वापरला आहे. राम मनोहर लोहियांबद्दल ते हे शब्द बोलणार आहेत का” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. “भाजप पक्ष फाटाफूट महाराष्ट्राची परिपक्वता बिघडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. हा शब्द कुठून आला, कोणी उचललेला, त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. इंदिरा गांधींचा संदर्भ येत असेल, तर काँग्रेसवर तोंडसुख घेण्याची मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसची भिती वाटते. म्हणून ते आम्हाला केविलवाणा डोस पाजण्याच प्रयत्न करत आहेत” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं