AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस, मराठवाड्यासह..

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. शेती पिके संकटात आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाबद्दल अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात दुष्काळाचे सावट आहे.

महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस, मराठवाड्यासह..
Maharashtra Weather Update
| Updated on: Sep 19, 2026 | 7:17 AM
Share

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस पाठ फिरवेल, असा अंदाज हवामान विभागाचा होता. पण काही भागात पावसाने हजेरी लावली. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विस्कळीत झाला. कबी दाब प्रणाली निवळल्यानंतर गुजरात 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. फक्त मुंबईच नाही तर पुण्यातही पाऊस सुरू आहे. मॉन्सूनच्या पावसाने अनेक भागात पाठ फिरवली. दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच हवामान विभागाने टेन्शन वाढवणारा इशारा दिला. राज्यावर दुष्काळाचे सावट आहे.

मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या गणेशोत्सवची धूम आहे. अनेक दिवसांपासून पावसाची कमी अधिक कोसळत आहे. शुक्रवारी रात्री देखील मुंबईच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, आज सकाळी पवई आणि जबळपासच्या भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात अखेर पावसाने पुनरागमन केले. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, या पावसामुळे ऐन मोक्यावर शेतात उभे असलेल्या धानपिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

अचानक झालेल्या या परिवर्तनामुळे वातावरणातील तापमान खाली आले असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भात पावसाची प्रतिक्षा वाढली आहे. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तापमान 34 ते 35 अंश सेल्सियस पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागानेही काल पावसाबाबत मोठा अंदाज वर्तवला होता. शेती पिके संकटात आहेत, पाऊस म्हणावा तसा कोसळत नाहीये.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद