AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Megablock | 24 तास महा-मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

ब्लॉक दरम्यान, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. कळवा मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याणहून चढण्याची मुभा देण्यात आली आहे.

Megablock | 24 तास महा-मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: File
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : मध्य रेल्वेनं आज प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक (Central Railway Mega block) घेण्यात येतो आहे. पहाटे पाच वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा महामेगाब्लॉक घेण्यात येतो आहे. मध्य रेल्वेच्या बहुप्रतिक्षित अशा पाचव्या आणि सहाव्या लाईनसाठी हा मेगाब्लॉक घेतला जात असून यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कळवा (Kalawa) आणि दिवा (Diwa) दरम्यान, अप आणि डाऊन स्लो लाईनवर (Slow Line) हा ब्लॉक घेतला जातो आहे. दरम्यान, ब्लॉक काळात मध्य रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम जाणवण्याची दाट शक्यता आहे. या काळात मध्य रेल्वेच्या गाड्या या अपेक्षित वेळेपेक्षा उशिरानं धावण्याचीही शक्यता आहे.

ब्लॉक दरम्यान महत्त्वपूर्ण बदल

ब्लॉक दरम्यान, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. कळवा मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याणहून चढण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेप्रशासनानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष बससेवाही ब्लॉक दरम्यानच्या काळात चालवली जाणार आहेत.

ब्लॉकदरम्यान, डोंबिवलीहून कोणतीही लोकल सुटणार नाही. त्याचप्रमाणे धीमी लोकल या ठाणे, डोंबिवली आणि दिव्यातील फास्ट प्लॅटफॉर्मवर थांबणार आहेत. तर मुंब्रा स्टेशनच्या नव्या प्लॅटफॉर्मवर थाभणार आहेत.

मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

24 तासांच्या मेगाब्लॉकमुळे अमरावती-मुंबई एक्सप्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आणि नांदेड-मुंबई राज्यरानी एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी धावणाऱ्या मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-अदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्विन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मुंबई-गडग एक्सप्रेस आणि मुंबई-नांदेड राज्यरानी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सोमवारी धावणाऱ्या अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस आणि गडग-मुंबई एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल!

दादर-हुबळी एक्सप्रेस यात्रा ही गाडी पुण्याहून रवाना होईल. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेसही रविवारी पुण्याहून रवाना केली जाणार आहे.

इतर बातम्या –

मुंबईत तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, तीन आफ्रिकन नागरिक अटक

बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम?

खात्यात बॅलन्स नसताना, बँक देईल मोठी रक्कम, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा उठवा फायदा, तारण ठेवा आणि सुविधा मिळवा 

पाहा व्हिडीओ –

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.