AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drug : मुंबईत तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, तीन आफ्रिकन नागरिक अटक

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांना बिकेसी भागात एक आफ्रिकन व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची प्रथम चौकशी असता त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 105 कोकेन तर 120 ग्राम मोफेड्रिन ड्रग्स सापडले.

Drug : मुंबईत तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, तीन आफ्रिकन नागरिक अटक
मुंबईत तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 5:40 PM
Share

मुंबई : मुंबईत नववर्षाच्या पार्टीसाठी आणण्यात आलेला सुमारे 3 कोटी 18 लाख रुपयांचा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी हे ड्रग्स आणण्यात आलं होतं. याप्रकरणी तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचचे जॉईंट सिपी मिलिंद भारंबे आणि अंमली पदार्थ विभागाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांना बिकेसी भागात एक आफ्रिकन व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची प्रथम चौकशी असता त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 105 कोकेन तर 120 ग्राम मोफेड्रिन ड्रग्स सापडले. इबे माईक असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशीत केली असता त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांची नावं सांगितली. हे ड्रग्स त्याला त्याच्या दोन आफ्रिकन साथीदारांनी विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

वाशी नाक्याहून अन्य दोघांना ताब्यात घेतले

अटक आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाचा नाका असलेल्या वाशी नाका येथे धाव घेतली. त्या ठिकाणाहून पोलिसांनी आणखी दोन आफ्रिकन नागरिकांना तांब्यात घेतलं. ओडिफे आणि मंडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडेही मोठा ड्रग्ज साठा सापडला. या तिघांकडे मिळून कोकेन 225 ग्रॅम, मेफेड्रीन 1500 ग्रॅम आणि एमडीएमए 235 ग्रॅम सापडलं आहे. या सर्व ड्रग्सची किंमत 3 कोटी 18 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी विभागाची ही एक मोठी कारवाई आहे. (Drugs worth Rs 3 crore seized in Mumbai, action taken by anti-narcotics squad)

इतर बातम्या

50 रुपये चोरल्याच्या रागातून बापाची मुलाला बेदम मारहाण; पुढे जे झाले ते पाहून पोलीसही चक्रावले

पैशांसाठी नातवानेच रचला कट, दरोडेखोरांना दिली आजोबांची टीप; पनवेलमधील 27 तोळे दागीन्यांच्या लुटीचे रहस्य उलगडले

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.