AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kambal Wale Baba : कंबलवाले बाबाचा ओम फट स्वाहा… महाराष्ट्रात खळबळ, सुप्रिया सुळे यांचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप काय?

महाराष्ट्रात सध्या एका गोष्टीमुळे राजकारण तापलं आहे. राजस्थानातील एका कंबलवाले बाबामुळे राजकारण तापलं आहे. का तापलंय या कंबलवाल्या बाबांमुळे राजकारण? कुणी आणलं त्याला मुंबईत? आणि कुणी केलाय कुणावर हल्लाबोल? जाणून घ्या सर्वकाही.

Kambal Wale Baba : कंबलवाले बाबाचा ओम फट स्वाहा... महाराष्ट्रात खळबळ, सुप्रिया सुळे यांचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप काय?
Kambal Wale BabaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 7:07 AM

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : राजस्थानातील कंबलवाले बाबावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. घाटकोपर येथे कांबळ टाकून दिव्यांगांचा इलाज करतानाचा कंबलवाले बाबाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपच्या आमदाराच्या उपस्थितीतच हा कंबलवाले बाबा महिलांना चुकीचा स्पर्श करत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप आमदार अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करून भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला या कंबलवाले बाबाचं ओम फट स्वाहा चांगलंच महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कंबलवाले बाबाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राजस्थानातील एक कंबलवाले बाबा आला आहे. तो घाटकोपरमध्ये दिव्यांगाच्या अंगावर कांबळ टाकून त्यांच्यावर उपचार करण्याचा दावा करत आहे. भाजप आमदाराच्या उपस्थितीत हा बाबा महिलांना चुकीचा स्पर्श करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

तर अंधश्रद्धा पसरवत असल्याप्रकरणी आमदार राम कदम यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राम कदम यांनी कंबलवाले बाबाचं घाटकोपरमध्ये शिबीर आयोजित केलं होतं. 14 आणि 15 सप्टेंबर रोजी कंबलवाले बाबा घाटकोपरमधील लोकांना भेटतील असं राम कदम यांनी फेसबुकवर लिहिलं होतं.

फेक बाबांना परवानगी कशी?

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून या प्रकरणी सवाल केला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या अंगावर कंबल टाकून त्यांना बरं करण्याचा दावा राजस्थान येथील एक बाबा करीत आहे. मुंबईतील घाटकोपर भागात भाजपा आमदाराच्या उपस्थितीत ती व्यक्ती महिलांना संतापजनक पद्धतीने स्पर्श करत आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही हि खेदाची बाब आहे. काहीही झालं तरी ‘आपलं बोलून मोकळं व्हायचं’ म्हणणारे हे सरकार, महिलांचा अशी राजरोसपणे विनयभंग होत असताना खंबीर पावले कधी उचलणार आहे?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सवाल केला आहे.

अशा व्यक्ती ज्या आमदाराचा आधार घेऊन अशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात त्या आमदारावर शासन कारवाई करण्याची तसदी घेणार आहे का? अशा भोंदू बाबा आणि अंधश्रद्धेला प्रागतिक विचारांच्या महाराष्ट्रात थारा देता कामा नये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एकीकडे चंद्रावर यान, दुसरीकडे…

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरले आहे. एकीकडे भारत चंद्रावर यान पाठवत आहे. दुसरीकडे भजापचे आमदार अंधश्रद्धा पसरवत आहेत. भाजप अशा अंधश्रद्धेचं समर्थन करते काय? सरकारला अशा अंधश्रद्धेत इंटरेस्ट आहे काय? सरकार या घटनेप्रकरणी कारवाई करणार का?, असे सवाल विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.

तुमच्या डॉक्टरांना घेऊन या

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जोरदार हल्ला केल्यानंतर आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका व्हिडीओद्वारे कदम यांनी प्रतिक्रिाया व्यक्त केली आहे. मी स्वत: विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. मला या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या घरातील सदस्यांना याचा फायदा झाला आहे. जे लोक या सनातन धर्माला अंधश्रद्धा म्हणत आहेत, त्यांनी आपल्या डॉक्टरांसह यावे. पाहावे आणि मग बोलावे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. मी अंधश्रद्धा पसरवत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

सही करताना झोपेत असतात का? राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर घणाघात
सही करताना झोपेत असतात का? राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर घणाघात.
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप.
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO.
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO.
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला...
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला....
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?.
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात.
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?.
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?.