AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया, शिंदे सेनेते कोण कोण जाणार?

Operation Tiger: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची वार्ता पुन्हा एकदा समोर आली आहे. शिंदे हे सध्या त्यांच्या सातारा येथील गावी आहेत. या घाडमोडीवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावत यांची जळजळीत प्रतिक्रिया काय?

Operation Tiger: विकली जाणारी औलाद... 'ऑपरेशन टायगर' चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया, शिंदे सेनेते कोण कोण जाणार?
अरविंद सावंत, शिवसेना Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 10:17 AM
Share

Operation Tiger: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याची गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात मराठवाड्यातील खासदार गळाला लागल्याची दावा करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी थंड पडलेली चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिंदे हे त्यांच्या दरे गावी आहेत. तिथून ते ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आज सकाळीच उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव सेनेचे 8 खासदार शिंदे सेनेत?

उद्धव ठाकरे शिवसेनेचे 8 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यात अरविंद सावंत यांचेही नाव समोर आल्यानंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला. त्यांनी माध्यमांवर आगपाखड केली. त्यांनी यावेळी अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया दिली. शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुद्दाम अशा चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा दावा सावंतांनी यावेळी केला.

उद्धव सेनेतून शिंदे सेनेत कोण कोण जाणार त्या 8 जणांमध्ये माझा पण फोटो आहे. कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नावं देत होती. आज माझाही फोटो दिला. आमचं नशीब आहे की, अनिल देसाई यांचं नाव वगळलं आहे. या बातमीचा कडाडून निषेध करतो. देशातील जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. एक लक्षात ठेवा मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं. तर उद्धव ठाकरे यांनी मला खासदार केलं आहे. गद्दारांच्या बाबतीत काय विचार आहे हे समजून घ्या अगोदर.

विकली जाणारी औलाद नाही

आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलो आहोत. भगवा घेऊन आलो आहोत आणि जाताना तो पांघरूण जाऊ. प्रत्येक खासदार हा ज्याच्या त्याच्या कामात आहे. त्यांच्या सोबत जे जे खासदार होते, त्याचा फोटो छापा मग. येत्या 24 तारखेला पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे यावर अंतिम सुनावणी आहे. मग अशा बातम्या सोडायच्या. कोर्टासमोर त्या मांडायच्या. विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं कोण हे तुम्ही ओळखा. पन्नास खोके एकदम ओके हे कोण म्हणालं होतं? कबुल केले ना त्यांनी जाहीर सभेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी कबूल केले ना, जाहीर केलं ना. आम्ही विकली जाणारी औलाद नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक