Abhijeet Dipke: इथंच आंदोलन करणार, अभिजीत दीपकेंची थेट शिवाजीपार्ककरांना नडण्याची भूमिका
Abhijeet Dipke on Shivaji Park Agitation: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके उद्या 2 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील आंदोलनावर ठाम आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता त्यांनी मोठा नारा दिला आहे.

उद्या 2 ऑक्टोबर, गांधी जयंती दिनी कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करण्यावर ठाम आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सीजेपीचं आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही विरोध केला आहे. तरीही दिपके याच ठिकाणी आंदोलन करण्यावर ठाम आहेत. उद्या CJP जेलभरो आंदोलन करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचं आंदोलन असेल.
स्थानिकांचा विरोध, तरीही सीजेपी आंदोलनावर ठाम
उद्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये सीजीपीचं आंदोलन होणार आहे. गांधी जयंती दिनी सीजेपीने आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात SIR प्रक्रियेवरून एल्गार पुकारण्यात आला आहे. आंदोलनाला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. यापूर्वी आंदोलक आणि सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली होती. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्येच आंदोलनाचा निर्धार बोलून दाखवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याठिकाणी पोलिसांनी बॅरिगेटिंग लावली आहे. सीजीपीच्या कार्यकर्त्यांकडून दोन वेळा मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र पाहणी दौऱ्यादरम्यान दोनदा सीजेपी आणि स्थानिक नागरिकांमध्ये बाचाबाची झाली होती. मात्र आंदोलन शिवाजी पार्क मैदानामध्येच करण्याची भूमिका सीजीपीने जाहीर केली आहे.
कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाचा श्रीगणेशा मुंबईतून करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी देशभरातील तरुणांना येण्याचे आवाहन सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केले आहे. “चला मुंबईला जाऊया” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे. हे आंदोलन गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी 4 वाजता होणार आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.