घाटकोपर घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

घाटकोपरमधील घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असं म्हणत मृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे.

घाटकोपर घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
CM-Eknath-shinde-Ghatkopar-hoarding-collapse.jpg
| Updated on: May 13, 2024 | 9:16 PM

मुंबईमधील घाटकोपरमधील रमाबाईनगर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याची दुर्दर्वी घटना घडली. या घटनेमध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बचावकार्य सुरू असून होर्डिंगखाली अजुन काही अडकले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण माहिती घेतली. यावेळी, या घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

घटना अतिशय दुर्देवी आहे. अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. जवळपास 57 लोकांना बाहेर काढलं आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व रेस्क्यू टीम काम करत आहे. नागरिकांना आधी बाहेर काढलं जाईल. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. होर्डिंगविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेत मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांच्या मदत केली जाईल. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी मोठं नुकसान केलं होतं. आज सोमवारी राजधानी मुंबमध्ये दुपारच्या सुमारास धुळीचं वादळ आलं. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं. मात्र घाटकोपर येखील रमाबाईनगरमधील पेट्रोल पंपावर पावसामुळे अनेक लोकं थांबली होतीत. पाऊस सुरू असतानाच त्या ठिकाणी असलेलं होर्डिंग पंपावर पडलं. संपूर्ण पंप होर्डिंगखाली झाकला गेला होता. त्यासोबतच तिथे असलेले लोकंही या खाली अडकले.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार  घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. होर्डिंगखाली अद्यापही 50 ते 60 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे. घाटकोपरमध्येच नाहीतर वडाळ या ठिकाणीसुद्धा एक होर्डिंग कोसळलं होतं.