AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA Disqualification Result | एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निकाल

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन केलं. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेला निकाल हा पूर्णपणे शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. तसेच शिंदेंचाच पक्ष हा मुख्य शिवसेना पक्ष आहे, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं आहे.

MLA Disqualification Result | एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निकाल
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 10, 2024 | 6:53 PM
Share

मुंबई | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील विधानसभा अध्यक्षांवी वैध ठरवली आहे.

“आमदार संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरविता येणार नाही”, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करताना म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांचं महत्त्वाचं निरीक्षण

“21 जून 2022 रोजीचा ठराव संमत केल्याने शिंदे शिवसेना अपात्र ठरतील असे म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रतिस्पर्ध्याचा गट उदयास आला तेव्हा शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष होता, असे माझे निष्कर्ष लक्षात घेता याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला. उत्तरकर्त्यांनी भाजपसोबत संगनमत करून काम केल्याचे पुढचे कारण म्हणजे निव्वळ आरोप आहे. त्यासाठी त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे दिलेले नाही. पुढील कारण – त्यांनी पक्षविरोधी विधान केले,.. यालाही पुरावे दिलेले नाही. त्याबाबतचे वृत्त केवळ अफवाच आहेत”, असं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं.

“निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे. एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक शिवसेना भवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती. त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते”, असंही अध्यक्ष म्हणाले.

“२१ आणि २३ जून २०२२ शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहे. या दिवशी शिंदे गट हाच खरी शिवसेना. भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती वैध आहे. एकनाथ शिंदे यांचे गटनेते पदी नियुक्तीही वैध आहे”, असा मोठा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला.

शिवसेनेच्या हे 16 आमदार पात्र :

  • एकनाथ शिंदे (ठाणे)
  • तानाजी सावंत (भूम परंडा)
  • प्रकाश सुर्वे (मागाठाणे, मुंबई)
  • बालाजी किणीकर (अंबरनाथ, ठाणे)
  • लता सोनावणे (चोपडा, जळगाव)
  • अनिल बाबर (खानापूर)
  • यामिनी जाधव (भायखळा, मुंबई)
  • संजय शिरसाट (छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
  • भरत गोगावले (महाड, रायगड)
  • संदीपान भुमरे (पैठण)
  • अब्दुल सत्तार (सिल्लोड)
  • महेश शिंदे (कोरेगाव)
  • चिमणराव पाटील (एरंडोल, जळगाव)
  • संजय रायमूलकर (मेहेकर)
  • बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
  • रमेश बोरणारे (वैजापूर)

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान