VIDEO : कलानी कॉलेजमध्ये गँगवार, विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले

VIDEO : कलानी कॉलेजमध्ये गँगवार, विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले

उल्हासनगर: उल्हासनगरमधील दुनिचंद कलानी कॉलेजच्या तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दोन गटातील वादाने हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उल्हासनगर पोलिसात या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिक चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता 20 ते 25 विद्यार्थी दिसत आहेत. दोन्ही गटातील वाद चिघळल्याने त्यांनी सरळ एकमेकांना मारहणा करण्यास सुरुवात केली. हे सर्व विद्यार्थी 20 ते 25 वयोगटातील आहेत. क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरी या घटनेवर कॉलेज काय कारवाई करेल हे पाहावे लागणार आहे.

अशा प्रकारच्या अनेक घटना आज कॉलेजमध्ये घडत असतात. मुंबईतही आज अनेक कॉलेज आहेत तेथे अशा प्रकारच्या घटना सतत होत असतात. मात्र याचा परिणाम शेजारी राहणाऱ्या लोकांवर तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर होतो. यावर पोलिसांनी तसेच शिक्षण संस्थेने पावलं उचलणे गरजेचे आहे.

Published On - 12:15 pm, Tue, 18 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI