हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य, इतकं निर्लज्जपणे कसं बोलू शकतो, भाई जगताप कडाडले

| Updated on: Jan 26, 2021 | 6:36 PM

दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले. लाज वाटली पाहिजे,अशा शब्दात भाई जगताप यांनी अनिल बोडेंना फटकारले. (Bhai Jagtap Anil Bonde)

हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य, इतकं निर्लज्जपणे कसं बोलू शकतो, भाई जगताप कडाडले
महानगरपालिका प्रशासन 500 फुटांखालील घरांना सरसकट करमाफी का लागू करत नाही, असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला. आता या सगळ्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Follow us on

मुंबई: मला या माणसाचं आश्चर्य वाटतं, हा कृषी मंत्री होता. इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, थोडी जरी शेतकऱ्यांबद्दल चाड असती, शेतकऱ्यांची व्यथांची.. काय गोष्टी करतोय हा माणूस, अशा शब्दांमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी माजी कृषी मंत्री अनिल बोडेंना (Anil Bonde) फटकारलं आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर काँग्रेस नेते भाई जगताप आणि भाजप नेते माजी कृषी मंत्री अनिल बोंडे टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. (Congress leader Bhai Jagtap slams Anil Bonde over Farmer Protest)

भाई जगताप काय म्हणाले?

मला या माणसाचं आश्चर्य वाटतं, हा कृषी मंत्री होता. इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, थोडी जरी शेतकऱ्यांबद्दल चाड असती, शेतकऱ्यांची व्यथांची.. काय गोष्टी करतोय हा माणूस कोण आहे हा?…. दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले. लाज वाटली पाहिजे, यांना सत्तेचा माज आलाय… यांचा माज बाहेर येतोय.. देशाचा अन्नदाता बसलाय दिल्लीत.. ते काही काँग्रेसवाले आहेत का…? इतकं अंधाधूंद माजलेले आहेत तुमचा माज शेतकरी आणि कामगार उतरवेल. यांनी हे केले त्यांनी ते केलं असं सांगता, तुम्ही काय केलं हे सांगा अशा शब्दांमध्ये भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला.

अनिल बोंडे काय म्हणाले?

नरेंद्र मोदींना मतदानाच्या माध्यमातून हरवता येत नाही. आज जेव्हा भारत सर्व आघाड्यांवर अग्रस्थानावर आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अराजक निर्माण करुन मोदींना नामोहरम करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. भाई जगताप, राहुल गांधी यांचे संपूर्ण भारतात अराजक माजवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचं काम काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षानं केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

Video: भाई जगताप आणि अनिल बोंडेंची जुगलबंदी

राहुल गांधींचे शांततेचे आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. मोदी सरकारनं तात्काळ तीन कायदे मागे घ्यावेत, असं राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या:

Delhi Farmers Tractor Rally | केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका घेऊ नये : शरद पवार

Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?

(Congress leader Bhai Jagtap slams Anil Bonde over Farmer Protest)