AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही ट्रॅप लावला, ट्रॅपमध्ये बदमाश सापडले’, पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस सर्वात मोठी कारवाई करणार

"आम्ही या निवडणुकीत काही संशयित काँग्रेस आमदारांच्या पाठीमागे ट्रॅप लावलेला होता. मी कुठेही नाकारत नाही. जे कुणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आले आहेत. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल", अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

'आम्ही ट्रॅप लावला, ट्रॅपमध्ये बदमाश सापडले', पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस सर्वात मोठी कारवाई करणार
नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 12, 2024 | 9:25 PM
Share

विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीकडे मतांचा कोटा पूर्ण असताना शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे महायुतीचे सर्व आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसची मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडील मतांचा कोटा पाहता प्रत्येक पक्षाने प्रत्येकी 1 असे एकूण केवळ 3 उमेदवार दिले होते. पण या निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटल्यामुळे शरद पवार गटाचा पराभव झाला आहे. या निवडणुकीनंतर काँग्रेसची मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे कुणीकुणी क्रॉस व्होटिंग केली याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी याबाबत माहिती दिली आहे. आपण ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये क्रॉस व्होटिंग करणारे आमदार सापडले आहेत. त्यांच्यावर आता पक्षातून काढून टाकण्याची कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले नेमकं काय-काय म्हणाले?

“विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या ट्रॅपमध्ये बदमाश लोकं सापडलेली आहेत. आम्ही वरिष्ठांना हे कळवलेलं आहे. लवकरच ज्यांनी पक्षविरोधी काम केलं, पक्षासोबत गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आम्ही आताच हायकमांडला याबद्दलचा अहवाल सादर केला आहे”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

“गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीवेळी, जे बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात घेतला, त्यांच्या पाठीमागे आम्ही या निवडणुकीत ट्रॅप लावलेला होता. मी कुठेही नाकारत नाही. जे कुणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आले आहेत. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणी तसं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही”, अशी आक्रमक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

“आपल्याला आम्ही सगळे नियम सांगितले आहेत. आपल्या लक्षात असेल आमच्या पक्षातील काही नेते सोडून गेले. त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच. तीपण नावे तुमच्यासमोर आहेत. आणखी काही लोकं आहेत. याबाबत हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबोडतोब, आता कोणतीही कमिटी येणार नाही, आता हायकमांडच्या आदेशाने आपल्याला नावेदेखील कळतील”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. काँग्रेस विश्वासावर देशावर काम करत आहे. त्या विश्वासावर आम्ही आमदार, खासदार निवडून आणतो. त्यामुळे आता गद्दारी करणाऱ्यांवर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणाची तसं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

Follow Us
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...