लसीकरण केंद्राचं उद्घाटन हा वार्डाचा कार्यक्रम, विधानसभेचा नाही, झिशान सिद्दीकींच्या नाराजीवर परबांचं उत्तर

| Updated on: May 07, 2021 | 8:07 PM

आपणही लसीकरणाचं राजकारण करणार आहात का? असा सवाल सिद्दीकी यांनी केलाय. त्यावर आता परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

लसीकरण केंद्राचं उद्घाटन हा वार्डाचा कार्यक्रम, विधानसभेचा नाही, झिशान सिद्दीकींच्या नाराजीवर परबांचं उत्तर
परिवहनमंत्री अनिल परब आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी
Follow us on

मुंबई : वांदे पूर्वमधील नव्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपण स्थानिक आमदार असूनही आपल्याला कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही, आपणही लसीकरणाचं राजकारण करणार आहात का? असा सवाल सिद्दीकी यांनी केलाय. त्यावर आता परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कुणाला बोलवायचं कुणाला नाही हा महापालिकाचा प्रश्न असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. (Anil Parab’s explanation regarding inauguration of vaccination center)

‘झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण द्यायला हवं होतं’

मुंबई महापालिकेकडून प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र सुरु करण्यात येत आहे. मला वॉर्ड ऑफिसरचा फोन होता. मला लेखी निमंत्रण नव्हतं. पण लसीकरण केंद्र घराबाहेरच असल्यानं मी जाऊन उद्घाटन केलं. स्थानिक आमदाराच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं, मी या मताचा असल्याचं परब म्हणाले. हा एका वार्डाचा कार्यक्रम होता, विधानसभेचा नाही. तरीही आमदार झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण द्यायला हवं होतं. प्रोटोकॉल पाळायला हवा होता, असंही परब यांनी म्हटलंय.

मी लहान गोष्टीत लक्ष घालत नाही. पण त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर आम्ही लक्ष घालू. यात राजकारण आणू नये, असं मला वाटतं. अजून 6 वार्ड आहेत, त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं, असंही परब म्हणाले. सिद्दीकी हे तरुण कार्यकर्ते आहेत. त्यांनी चांगलं काम करावं. त्यांना माझ्या शुभेच्छा, असंही परब म्हणाले.

झिशान सिद्दीकींची नाराजी

वांद्रे पूर्वमधील लसीकरण केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. पण या कार्यक्रमात डाववल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यातं आलं नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का? असा सवाल आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्वीट करत शिवसेनेला विचारला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

Anil Parab’s explanation regarding inauguration of vaccination centerAnil Parab’s explanation regarding inauguration of vaccination center