मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?

| Updated on: Dec 05, 2020 | 5:14 PM

येत्या जानेवारी महिन्यात या स्टोरेज रुमची सर्व तयारी करण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Corona Vaccine Cold storage Center In Mumbai)

मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?
Follow us on

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत सध्या कोरोना लसीच्या वितरणाची जोरदार तयारी केली जात आहे. कोरोना लसीच्या साठवणूक करण्यासाठी मुंबई महापालिकेने कांजूरमार्ग येथील जागा निश्चित केली आहे. नुकतंच या जागेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनीही ही जागाा नेमकी कशी असेल, याची माहिती दिली. (Corona Vaccine Cold storage Center In Mumbai)

कोव्हिड लसीच्या साठवणुकीसाठी कांजूरमार्ग आरोग्य विभागाच्या इमारतीत 5 हजार स्के. फूट जागा निश्चित केली आहे. यात जागेत मुंबईला पुरवठा होणाऱ्या लसीची साठवणूक केली जाईल. यासाठी लवकरच ई-टेंडरची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात या स्टोरेज रुमची सर्व तयारी करण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

कोरोना लसीची साठवणूक करण्यात येणाऱ्या जागेत नियंत्रित तापमान राखले जाणार आहे. या ठिकाणी 40 क्युबिक क्षमतेची उपकरणं बसवण्यात येतील. या लसीच्या साठवणूक होणाऱ्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू नये, याची काळजी घेतली जाईल, असेही मुंबईच्या महापौरांनी सांगितले. (Corona Vaccine Cold storage Center In Mumbai)

कशी असेल कोरोना लसीची स्टोरेज रुम?

?कोव्हिड 19 या लसीच्या साठवणुकीसाठी कांजूरमार्ग परिवार संकुलात एक अत्याधुनिक शीतगृह निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी पुरेशा जागेची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.

?या जागेत +2 अंश सेल्सिअस ते + 8 अंश सेल्सिअस तापमान राखत असलेले 40 क्युबिक मीटरचे 2 उपकरणे बसवण्यात येणार आहे.

?यातील एक – 15°C ते – 25°C तापमान राखत असलेला एक 20 क्युबिक मीटरचे उपकरण बसवण्यात येणार आहे.
या शीतगृहात मुंबईला आवश्यक असलेल्या कोव्हिड 19 या लसीचा पुरेसा साठा ठेवण्याची क्षमता आहे.

?कोरोना लसीच्या स्टोअरेज रुममध्ये उजव्या बाजूला वर्कशॉप, कोल्ड स्पेस आणि स्टोर क्लॅर्क आणि ड्राय स्टोअर असणार आहे.

?या रुमच्या मध्यभागी लिफ्ट फोर्क व्हिकल असेल. तर डाव्या बाजूला WIC, आणि Conditioning ice Packs या रुम बनवण्यात आले आहे.

दरम्यान ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचारी, कोविड लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागनिहाय माहिती घेऊन आरोग्य शिबीर आयोजित केले जातील. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

सर्वप्रथम लस कोणाला मिळणार?

शासकीय कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

खासगी कर्मचारी : रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत. (Corona Vaccine Cold storage Center In Mumbai)


संबंधित बातम्या : 

मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी, आरोग्य सेवकांना प्रथम प्राधान्य

आता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोनाची चाचणी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; रुग्णांना दिलासा