मुंबईकरांनो, सावधान! चुकीच्या सवयीमुळे झपाट्याने वाढले रुग्ण

| Updated on: Oct 11, 2020 | 2:30 PM

मुंबईत वाढणाऱ्या निदानाला मुंबईकरांच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी मांडले.

मुंबईकरांनो, सावधान! चुकीच्या सवयीमुळे झपाट्याने वाढले रुग्ण
Follow us on

मुंबई : राज्यात काही केल्या कोरोनाचा संसर्ग काही कमी होताना दिसत नाही. अशात राज्यात मागील सहा दिवसांत 15 हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे मुंबईत मात्र, रोजच्या निदानाचा आकडा हा दोन हजारांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. काही दिवसापासून हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. (coronavirus cases rapidly increasing in Mumbai Maharashtra update)

राज्यात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानामुळे शोध, तपासणी, निदान या सूत्रांद्वारे वेगाने अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. परिणामी, अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा शोध घेतल्याने त्यांना उपचार प्रक्रियेत आणणे सोपे झाले आहे. दुसरीकडे मुंबईत वाढणाऱ्या निदानाला मुंबईकरांच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी मांडले.

कोविड पश्चातची जीवनशैली मुंबईकरांनी अजून स्वीकारलेली नाही. मास्क घालण्याविषयी अजूनही मुंबईकरांमध्ये गांभीर्य नाही. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटत नसल्याने रुग्ण वाढत आहेत. परिणामी, मुंबई महापालिकेने याची दखल घेऊन मास्क न घालण्याविषयीच्या दंडात वाढ करावी. पालिका असो किंवा राज्य सरकार, दोन्ही प्रशासनाकडून कडक निर्बंधांची सक्ती केली जात नाही.

नियम पाळणे ही सामान्यांचीही जबाबदारी आहे. अनेकदा ते नियम पाळताना दिसत नाहीत. मुंबईत आता 60 टक्क्यांहून अधिक व्यवहार सुरळीत झाले आहेत किंवा होण्याच्या प्रक्रियेत आहेत. अशा स्थितीत लोकसंख्येची घनता लक्षात घेता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरे पडणार नाहीत.
(coronavirus cases rapidly increasing in Mumbai Maharashtra update)

गेल्या 10 दिवसातील वाढती कोरोना संख्या
1 ऑक्टोबर – 2352
2 ऑक्टोबर – 2440
3 ऑक्टोबर – 2402
4 ऑक्टोबर – 2109
5 ऑक्टोबर – 1813
6 ऑक्टोबर – 1625
7 ऑक्टोबर – 2848
8 ऑक्टोबर – 2823
9 ऑक्टोबर – 2287
10 ऑक्टोबर – 2203
एकूण कोरोना संख्या – 227251
बरे झालेले रुग्ण – 192096
एकूण मृत्यू – 9388

मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, चाचण्यांची क्षमता वाढवल्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत सर्वाधिक चाचण्या पार पडल्या. पालिकेने गेल्या सहा महिन्यांत 11 लाख 68 हजार चाचण्या केल्या. यापैकी 52 टक्क्यांहून अधिक चाचण्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत अनलॉक सुरू झाल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते.

खरंतर, मुंबईत महापालिकेची रुग्णालयं महत्त्वाची आहेत. त्यामध्ये covid-19 उपचार मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. 24 तासांमध्ये सायन आणि केईएम रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबई महापालिका कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.

इतर बातम्या – 

मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
Weather Alert: पुढच्या 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून इशारा

 

(coronavirus cases rapidly increasing in Mumbai Maharashtra update)