3 वाजेच्या आत मुंबई रिकामी करा, अन्यथा… कोर्टाचा राज्य सरकारला दोन तासाचा अल्टिमेटम; कोर्टात काय काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, आझाद मैदान खाली करण्याचे आदेश पोलिसांनी दिली आहेत. यासोबतच कोर्टात मोठी सुनावणी सुरू आहे. त्यामध्येच कोर्टाने मोठे विधान केले आहे.

3 वाजेच्या आत मुंबई रिकामी करा, अन्यथा... कोर्टाचा राज्य सरकारला दोन तासाचा अल्टिमेटम; कोर्टात काय काय घडलं?
Mumbai High Court
| Updated on: Sep 02, 2025 | 2:05 PM

मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, आझाद मैदान खाली करण्याचे आदेश पोलिसांनी दिली. यासोबतच कोर्टात मोठी सुनावणी सुरू आहे. मराठा आंदोलकातर्फे सतीश मानेशिंदे युक्तिवाद करणार आहेत. सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आहेत. आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते असतील. सुनावणीला सुरुवात झाली असून 3 पर्यंत मुंबई खाली करा, असे थेट आदेश आता कोर्टाने दिली आहे. मराठा आरक्षणाला मोठा धक्का कोर्टाने दिलाय.

गुणरत्न सदावर्ते युक्तिवाद करत आहेत. आंदोलन करणारे 5 हजार लोक नेमके लोक आहेत, असे हायकोर्ट म्हटले. 5 हजार लोकांना जर परवानगी होती तर त्यासाठी तुम्ही काय केल की तेवढेच लोक इथे यावेत, असे कोर्टाने म्हटले. सतीश मानेशिंदे म्हणाले की 5 हजार लोकांना आंदोलनासाठी परवानगी होती. जवळपास 50 हजार ते 1 लाख लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत. मानेशिंदे यांनी म्हटले, आम्ही मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल होत की पाच हजार लोकांनीच थांबावे.

किती गाड्या आल्या आहेत त्यांचे डिटेल द्या, असे कोर्टाने म्हटले. आम्ही आवाहन केल्यानंतर बरेचसे लोक आता परतत आहेत, असा दावा मानेशिंदे यांनी केलाय. कालच्या आदेशात बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याकडे आम्ही कानाडोला करू शकत नाहीत, हायकोर्ट म्हटले. आम्ही राज्य सरकारलाही प्रश्न विचारतोय की, तुम्ही काय करत आहेत. तीन वाजता कोर्टात या आणि आम्हाला सांगा नेमक काय करत आहात, असे कोर्टाने म्हटले.

आताच्या आता योग्य ती कारवाई करा अन्यथा आम्हाला तीन वाजता ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे हायकोर्ट म्हटले. तीन वाजेपर्यंत काय कारवाई करताय आणि काय वस्तुस्थिती आहे ते कळवा असे हायकोर्ट सरकारने म्हटले. तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरुय ते बेकायदेशीर आहे, असे हायकोर्ट अगदी स्पष्ट म्हटले. तुम्ही या समाजाचे एक महत्वाचे घटक आहात, हे आमचे शब्द नाहियेत तर इथल्या न्यायिक यंत्रणेचे आहेत हे लक्षात घ्या, हायकोर्टने सतीश मानेशिंदे यांना कोर्ट यांना म्हटले.

तुम्ही लाऊडस्पीकरवर सूचना दिल्या आहेत का ? असे कोर्टाने विचारले. मी पाहिल की एयरपोर्टपासून माझ्याघरापर्यंत एकही पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मला दिसली नाही. आम्ही कोर्टाचा अवमान झाला असे समजून कारवाई करू शकतो, कोर्टाने म्हटले. 2 वाजून 40 मिनिटानी मी पुन्हा कोर्टात येईन तेंव्हा मला सगळे रस्ते रिकामी दिसले पाहिजे अन्यथा तीन वाजता आम्ही ठोस कारवाई करू, असे कोर्टाने म्हटले आहे.