AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! छगन भुजबळ मैदानात, म्हणाले, ओबीसीतून मराठा आरक्षण देत येणार नाही, थेट दाखवली कागदपत्रे

ओबीसींच्या आरक्षणासाठी आता छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. आता त्यांनी मराठा आरक्षणावर थेट मोठे भाष्य केले. हेच नाही तर त्यांनी कोर्टाच्या निकालाची काही कागदपत्रेही दाखवली आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्या.

मोठी बातमी! छगन भुजबळ मैदानात, म्हणाले, ओबीसीतून मराठा आरक्षण देत येणार नाही, थेट दाखवली कागदपत्रे
Chhagan Bhujbal
| Updated on: Sep 02, 2025 | 1:03 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. ओबीसीतून आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी ते आरक्षणाला बसले आहेत. मात्र, आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. छगन भुजबळ यांंनी म्हटले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. मंडळ आयोगाने या पूर्वीच सांगितले आहे की, मराठा समाज हा पुढारलेला समाज असून त्यांना आरक्षण देता येणार नाही. चार आयोगाने मराठा समाजाबद्दल महत्वाचे अहवाल दिले असून त्यांनी म्हटले की, समाजिक सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास नाहीये.

यासोबतच छगन भुजबळांनी स्पष्ट म्हटले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर सगळेजण हे सुप्रीम कोर्टात त्यावेळी गेले, हेच सुप्रीम कोर्टाने देखील त्यावेळी म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने निकाल देत म्हटले की, हा समाज आर्थिकदृष्ट्या काही मागासलेला असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल परंतू हा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही. यावेळी छगन भुजबळ हे कोर्टाच्या निकालाची प्रत दाखवताना दिसले. यासोबतच त्यांनी कोर्टाचा निकालही वाचून दाखवला.

पुढे छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यामुळे तो स्वतंत्ररित्याही ओबीसीत येऊ शकत नाही किंवा कुणबी मराठा म्हणून सुद्धा येऊ शकत नाही. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचे कोर्टाचे निरीक्षण आहे. मागास नसल्याने कुणबी हे देखील ओबीसीत येऊ शकत नाहीत. सारथीच्या माध्यमातून जे ओबीसींना मिळते ते मराठा समाजाला देण्यात आलंय. 100 टक्के देण्यात आल.

यावेळी कोर्टाच्या निकालाच्या प्रत दाखवताना छगन भुजबळ हे दिसले. हेच नाही तर ओबीसींची महत्वाची बैठक मुंबईत होणार आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील ओबीसींचा जोरदार विरोध हा बघायला मिळतंय. जर ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा थेट इशारा ओबीसी समाजाने दिला आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.