मराठा आंदोलन चिघळावे यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करतात, संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मुंबईमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत. नुकताच आता आझाद मैदान खाली करण्याची नोटीस ही पोलिसांनी दिली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप केली आहेत.

मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका संजय राऊत यांनी केलीये. यासोबतच त्यांनी थेट राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, न्यायालयाच्या चौकटीत राहून आंदोलन करणे योग्य आहे हे न्यायालयाचे मत आहे. मराठा आंदोलक दहशतवादी आहेत का? घुसखोर आहेत का? आम्ही सुद्धा न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत पण आमच्या मराठा बांधवांना मुंबई बाहेर काढण्यासाठी लवकर निर्णय झाला. न्यायदानाच्या प्रक्रियेत काही विशिष्ट प्रवृत्तीचे लोक बसवले आहेत, त्यात भाजपचे प्रवक्ते देखील असल्याचे राऊतांनी म्हटले.
पुढे बोलताना राऊत यांनी म्हटले की, मुंबईमध्ये सध्या क्रिकेटचा खेळ होत नाही ते ब्रेबान स्डेडियम आंदोलकांना देता आले असते. आझाद मैदानावर पावसाळ्यामुळे चिखल आहे. दारू पिण्याऐवजी दुसरा काही कार्यक्रम होत नाही त्या क्लबमध्ये तिथे मराठा आंदोलकांना जागा द्यायाला हवी असे मला वाटते. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत जी बैठक झाली, त्यामधील लोकांना अजिबताच गांर्भिय नव्हते. उच्च न्यायालयाला भान आहे का? आज न्यायव्यस्था कोलमडली आहे.
माजी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्र्यानी कॅबिनेटसह विरोधी पक्षांना सोबत घेऊन मनोज जरांगे सोबत चर्चा करावी. रस्ते खाली करा हे न्यायालयाचे आदेश आहे ही नवी न्यायसंहिता आली आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, भाजपचे हे राजकारण आहे, दोन समाजात भांडण व्हावे हे भाजपचे राजकारण आहे. भुजबळ थेट पणे सांगत आहेत मी औबीसींचा नेता आहे.
कुठे आहेत मराठा समाजाचे नेते? कुठे आहेत उदयनराजे? असेही राऊतांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की, हे आंदोलन चिघळावे, गावागावात दंगली उसळाव्यात याकरिता मंत्रिमंडळातील काही लोक काम करत आहेत. हे न्यायालयाला माहित नसेल परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी, मुख्यमंत्री बदलण्यात यावा यासाठी मंत्रिमंडळातील काही शक्ती काम करत आहेत.
मंत्रिमंडळातील काही लोक आंदोलनांच्या आडुन राजकीय पोळ्या भाजुन घेत आहेत. फडणवीसांनी आपल्या घरात आग लावुन घेतली आहे, शिवसेना फोडुन. अमित शाहाच्या पाठींब्याशिवाय हे होत नाही. दिल्लीतील भाजपचा एक मोठा गट फडणवीसांच्या विरोधात हे राजकारण करत आहे आणि अमित शहांच्या पाठिंब्याशीवाय हे शक्य नाही, असाही गंभीर आरोप हा संजय राऊत यांनी लावला आहे.
