AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : शनिवारी या चुका टाळाच, अन्यथा शनिदोष निर्माण झालाच म्हणून समजा

हिंदू धर्मशास्त्रानुसार शनि देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, शनि देव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर शनि देव प्रसन्न झाले तर रंकालाही राजा बनवतात, मात्र शनि देव नाराज असतील तर तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं. आज आपण शनिदोषाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : शनिवारी या चुका टाळाच, अन्यथा शनिदोष निर्माण झालाच म्हणून समजा
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 10:08 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रानुसार शनि देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, शनि देव हे कर्म फळ दाता आहेत, म्हणजेच ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीचे कर्म हे चांगले असतील तर त्याला नक्कीच चांगलं फळ शनि देव देतात, मात्र जर एखाद्या व्यक्तीचं कर्म हे वाईट असेल, तर त्याच्यामागे शनि पिडा लागते असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला शनिदोष असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, मात्र वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही शनिदोष दूर करू शकता, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधीन कधी शनिची साडेसाती ही येतेच, अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जर शनि देव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाले तर रंकाचाही राजा होतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या शनिवारच्या दिवशी खरेदी करू नयेत, त्यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

लोखंड – वास्तुशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी कधीही लोखंड खरेदी करू नये, यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. शनिदेव नाराज होतात. काहीही कारण नसताना घरात वादविवाद होतात, भांडणं होतात. त्यामुळे शनिवारच्या दिवशी कधीही लोखंड खरेदी करू नये असं वास्तुशास्त्र सांगतं, मात्र तुम्ही शनिवारी लोखंड दान देऊ शकता. त्यामुळे शनि देव प्रसन्न होतात.

मीठ- लोखंडाप्रमाणेच शनिवारी कधीही मीठ खरेदी करू नका, जर तुम्ही शनिवारी मीठ खरेदी केलं तर घरात शनिदोष निर्माण होतो. शनि देव नाराज होतात. यामुळे घराची आर्थिक स्थिरता नष्ट होते, घरावर कर्जाचा भार वाढतो, त्यामुळे कधीही शनिवारी मीठ खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. शनिवारी मीठ खरेदी करू नये, मात्र ते तुम्ही दान करू शकता, जर तुम्ही शनिवारी मीठ दान केलं तर शनि देव प्रसन्न होतात, तुमची शनि दोषातून सुटका होते. ज्यांना शनिची साडेसाती सुरू आहे, किंवा घरात शनिदोष निर्माण झाला आहे, अशा व्यक्तींनी दर शनिवारी शनि देवाची पूजा केल्यास तसेच शनि देवांना तेल अर्पण केल्यास शनिदोष दूर होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?
Abhijeet Dipke | पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?; नेमकी काय आहे मागणी?