AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना कोणाची? खटला सुप्रीम कोर्टात सुरू असताना उद्धव ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदार भेटीवर आक्षेप घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जनतेला मोठं आवाहन केलं आहे.

शिवसेना कोणाची? खटला सुप्रीम कोर्टात सुरू असताना उद्धव ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन
| Updated on: Aug 08, 2026 | 1:30 PM
Share

शिवसेना कोणाची, यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना फुटीर खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. या भेटीवरून ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे. सुनावणी सुरू असताना फुटीर खासदार आणि पंतप्रधान मोदींची भेटीच्या कार्यक्रमावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. या माध्यमातून न्यायालयावर दबाव आणला जात आहे, असा आरोप थेट उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी जनतेची आहे, असं आवाहनच थेट उद्धव ठाकरे यांनी केलं.

पंतप्रधान मोदी यांनी काल फुटीर खासदारांची भेट घेतल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे आधी अमित शहा यांना भेटायचे. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत आहे. अमित शहा मुंबईत असताना ते पंतप्रधान मोदींना भेटताहेत. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा धमकी वजा संदेश मोदींनी कुणाला दिला? अमित शहांना, कोर्टाला की फडणवीस यांना दिला? कोर्टाला ही पेपरची कात्रण द्या. वातावरण कसं निर्मिती केली जात आहे हे सांगा’.

‘खरंतर ही लढाई शिवसेनेपुरती नसून गद्दारीचा हा व्हायरस देशभर पसरतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर पक्षातील गद्दारांनाही हा संदेश दिला का? आमच्याकडे यावे? तुमच्या केसालाही हात लागणार नाही. मी तुमच्या पाठिशी आहे. पीएम मोदींची धमकी कुणाला ? अमित शहा, फडणवीस की कोर्टाला, याचा खुलासा झाला पाहिजे’.

जनतेला आवाहन करताना म्हटलं की, ‘देशात गद्दारीचा व्हायरस पसरत आहे. मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांनी लोकशाहीसाठी लढलं पाहिजे. देशातील तरुणाचं माथं भडकलं आहे. आता त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी तरुण ऐकायला तयार नाही. मोदींचं आवाहन गंभीर असून आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहोत. पण मोदींनी कुणाला धमकी दिली. गद्दारांना कुणाची भीती आहे, हे समोर आलं पाहिजे. माझ्या मनातील शंका कळावी म्हणून वाचा फोडत आहे, असे ठाकरेंनी पुढे सांगितले.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?