AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackrey : सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले? भिऊ नकोस हा संदेश कुणासाठी? शाह, फडणवीस की कोर्टासाठी? : ठाकरे

पंतप्रधान मोदींनी दिल्लीत शिंदे गटाच्या 6 खासदारांची भेट घेऊन त्यांना 'भिऊ नकोस, मी तुमच्यासोबत आहे' असे आश्वासन दिले. या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'वरून उद्धव ठाकरे गटाने तीव्र टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या या संदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही धमकी अमित शहांना, कोर्टाला की फडणवीस यांना आहे, असा थेट सवाल विचारला.

Uddhav Thackrey : सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले? भिऊ नकोस हा संदेश कुणासाठी? शाह, फडणवीस की कोर्टासाठी? : ठाकरे
मोदी- फुटर खासदारांच्या भेटीवरून उद्धव ठाकरे संतप्त
| Updated on: Aug 08, 2026 | 3:53 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलक आणि तरुणांना भेटण्यासाठी वेळ नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही वेळ नाही. मात्र, शिवसेना सोडून शाह सेना स्थापन करणाऱ्या गद्दारांना भेटायला पंतप्रधानांना वेळ आहे. पंतप्रधानांनी फक्त त्यांची भेट घेतली नाही तर ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे’, असं आश्वासनही दिलं, असं म्हणत संतापलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. कोर्टात सुनावणी सुरू असताना तुम्ही फुटीर खासदारांची भेट का घेतली? त्यातून काय संदेश द्यायचा होता? अमित शाह, देवेंद्र फडणवीस की कोर्टाला यातून धमकी द्यायची होती? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी मोदी आणि फुटीर खासदार यांची भेट या मुद्यावरून जोरदार हल्ला चढवला.

शिवसेना ठाकरे गटातून फुटून एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) पक्षात गेलेल्या 6 फुटीर खासदारांनी काल राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींच्या या ब्रेकफास्ट डिप्लोमसीची खूप चर्चा झाली. यावेळी त्यांनी सर्व खासदारांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला, त्यांना धीर दिला. तुम्ही चिंता करू नका,. मी तुमच्यासोबत आहे. एनडीए हे एक कुटुंब आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना धीर दिला. मात्र याच भेटीवरून आता शिवसेना ठाकरे गटाने जोरदार हल्ला चढवला आहे. आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून टीका केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही टीका केली.

जेन- झी आंदोलनाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी  विद्यार्थी आंदोलनाचा हवाला दिला. देशातील परिस्थिती ही वादळापूर्वीची शांतता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या देशातील तरूणाईची म्हणजे जेन-झी, या पिढीने सरकारला कसं गुडघ्यावर आणलं, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी, त्यांच्यावर निर्घृणपणे अत्याचार करण्यात आले. काहींना तर जालियनवाला बाग हत्याकांडाची, त्या अत्याचाराची आठवण झाली. लाठीला खिळे मारले गेले, अश्रूधूर सोडले गेले, पेलेट गनने त्यांच्यावर छर्रे मारले, कोणाची डोकी फोडली, कोणाचे पाय मोडले. अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं, त्यांवा देशद्रोही असं संबोधण्यात आलं. एवढं केल्यावर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाहीये, त्यांच्याशी बोलण्याची गृहमंत्र्यांची तयारी नाहीये. आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधान आणि गृहमंत्र्याकडून उत्तर मागतोय की हे अत्याचार तुम्ही का केलेत, कशासाठी केलेत? एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटत नाही. संपूर्ण सिस्टीम, सरकार आता बदललं गेलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

इन्स्टावरून देश चालवण्याची वेळ आलीये

माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. “मी कोरोना काळात फेसबुक लाइव्ह करायचो. त्यावेळी मला उपदेश द्यायचे, फेसबुकवरून सरकार चालत नाही. मग, आता यांच्यावर इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे.एवढी यांची हालत खराब झाली आहे” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. काँग्रेसने एवढ्या शिव्या कधीच खाल्ल्या नव्हत्या त्या मोदी आणि शाहांच्या वाट्याला आल्या आहेत. तरुणांना भेटायला वेळ नाही. ते गद्दारांना भेटत आहे. शाह सेना स्थापन करणाऱ्या गद्दार पंतप्रधानांना भेटले. त्यांना भेटायला मोदींना वेळ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भिऊ नकोस , हा पंतप्रधानांचा संदेश नेमका कोणाला ?

मोदींनी गद्दारांना सांगितलं चिंता करू नका. आपल्याकडे स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठिशी, तसं मोदी म्हणतात भिऊ नका. आता मोदी नवे स्वामी झाले का, असं ठाकरेंनी विचारलं. मोदी आंदोलकांना, विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, पण गद्दारांना भेटतात. बेशरमपणे गद्दारांना नुसते भेटत नाही. तर मी तुमच्या पाठिशी आहे असं बेशरमपणे सांगतात, असं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

त्यांची चर्चा बंद दाराआड झाली होती, मग हे वाक्य बाहेर येण्याचं कारण काय? त्यातून कोणाला संदेश द्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीने शिंदे टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्यासाठी तर हे वाक्य नाही ना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हा संदेश कुणाला, कोर्टाला धमकी देत आहे का? की अमित शाह यांना धमकी देत आहेत ? शिंदे पूर्वी अमित शाह यांना भेटायचे. आता मोदींना भेटत आहेत. शाह इथे असताना ते मोदींना भेटतात. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा धमकी वजा संदेश मोदींनी कुणाला दिला आहे ? शाहांना, कोर्टाला की फडणवीस यांना दिला ? असं ठाकरेंनी स्पष्टच विचारलं.

ही लढाई आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही. गद्दारीचा हा व्हायरस देशभर पसरत आहे. मोदींनी इतर पक्षातील गद्दारांनाही हा संदेश दिला का. आमच्याकडे या, तुमच्या केसालाही हात लागणार नाही, मी तुमच्यापाठी आहे, असंत ते सांगत आहे, हे फार आक्षेपार्ह आहे. मोदींचं हे आवाहन गंभीर आहे. आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहोत. पण मोदींनी कुणाला धमकी दिली. गद्दारांना कुणाची भीती आहे. हे समोर आलं पाहिजे, अशा शब्दात संतप्त उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?