AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : होस्टच्या इंग्रजी प्रश्नांवर ‘सैराट’ फेम अर्चीने दिली मराठीत उत्तरं…, सर्वत्र रिंकूचीच होतेय चर्चा…

Video : "मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू?" म्हणणाऱ्या अर्चीने होस्टच्या इंग्रजी प्रश्नावर भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल, सर्वत्र होतंय रिंकूचं कौतुक

Video : होस्टच्या इंग्रजी प्रश्नांवर 'सैराट' फेम अर्चीने दिली मराठीत उत्तरं..., सर्वत्र रिंकूचीच होतेय चर्चा...
अभिनेत्री रिंकू राजगुरु
| Updated on: Aug 08, 2026 | 1:17 PM
Share

‘सैराट’ फेम अर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील रिंकू तिच्या खास अंदामुळे चर्चेत आली आहे. ‘सैराट’ सिनेमात कायम “मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू?” हा एकच डायलॉग बोलणाऱ्या रिंकू हिला ‘फिल्मफेअर मराठी अवॉर्ड’ सोहळ्यात होस्टने काही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले, यावर अभिनेत्री कोणताच न्यूनगंड न बाळगता सर्व प्रश्नांची मराठीत उत्तरं दिली आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

होस्टने रिंकू हिला इंग्रजीतून विचारते, ‘फिल्मफेअर मराठी अवॉर्डच्या रात्रीचं एका मराठी शब्दांत वर्णन कसं करशील?’ यावर रिंकू म्हणते, ‘रंगीन दुनिया…’, दुसरा प्रश्न होस्ट विचारते, ‘कोणत्या गोष्टीशिवाय फिल्मफेअर पूर्ण होऊ शकत नाही?’ यावर रिंकू म्हणते, ‘द ब्लॅक लेडी…’, तिसरा प्रश्न होस्ट विचारते, ‘मराठीतील एक पात्र जे तुला रेड कार्पेटवर पाहायला आवडेल?’ यावर रिंकू म्हणते, ‘खरं सांगायचं झालं तर, सगळेच आहेत. असं कोणाचं एकाचं नाव घेता येणार नाही. प्रत्येकाची एक वेगळी स्पेशालिटी आहे…’, ‘अवॉर्डनंतर पार्टी कोणी देईल?’ यावर रिंकू म्हणते, ‘जे कोणी जिंकतील ते सगळेच… ‘, सध्या रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

रिंकू्च्या व्हिडीओ एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मराठी मुलगी…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला तुझा खूप गर्व आहे, इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देखील तू मराठीत उत्तर दिलं…’. ‘मराठी भाषेचा मान राखलास हे खूप महत्वाचे आहे रिंकु याचा मला खूप अभिमान आहे.’ असं देखील एक नेटकरी म्हणाला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिंकूच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, ‘सैराट’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलंं नाही. आज रिंकू मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर रिंकूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?