‘उद्धव ठाकरे लवंगी फटाका, पवार साहेबांनी वात लावली की…’ भाजप नेत्याचा ‘मविआ’वर घणाघात
संजय राऊत म्हणजे स्वतःच्या हातातच फुटणारा फटाका आहे, तर शरद पवार साहेबांनी समोरून वात लावली की तो फटाका मागून फुटतो," असा टोला संजय केनेकर यांनी लगावला.

रामनाथ ढाकणे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी:
BJP MLA Sanjay Kenekar ON MVA: महाविकास आघाडी हा सर्वात मोठा फुसका फटाका आहे तर तर जो वात पेटल्यावरही फुटत नाही तो लवंगी फटाका म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे स्वतःच्या हातातच फुटणारा फटाका आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांनी जोरदार फटकेबाजी केली. छत्रपती संभाजीनगर येथे ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले संजय केणेकर?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे सातत्याने समृद्धीची रोषणाई करणारा फटाका आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे कणखर आणि सातत्याने प्रज्वलित राहणारा फटाका आहे. महायुतीचे तीन फटाके सातत्याने रोषणाई देणारे आहेत. दुसरीकडे जो वात पेटल्यावरही फुटत नाही तो लवंगी फटाका म्हणजे उद्धव ठाकरे तर संजय राऊत म्हणजे स्वतःच्या हातातच फुटणारा फटाका आहे, तर शरद पवार साहेबांनी समोरून वात लावली की तो फटाका मागून फुटतो,” असा टोला संजय केनेकर यांनी लगावला.
तसेच “संजय राऊत यांच्या फटाक्यामुळेच शिवसेना उद्ध्वस्त झाली. त्यांच्या आतषबाजीमुळे त्याने घरातच पेट लावला. ज्यांच्या वातीच पेटल्या नाही त्या फटाक्याबद्दल बोलायचं तरी काय, ते आता फटाकेच राहिले नाही,” असं म्हणत आमदार संजय केणेकर यांनी महाविकास आघाडी मधील नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली.
उद्धव ठाकरेंवर निशाणा!
यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “कोरोनाचा काळ असो किंवा दुष्काळाचा भारतीय जनता पार्टीचे नेते कधीच एका जागी थांबले नाहीत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना समृद्ध करण्याची भावना त्यांनी ठेवली. तुम्ही एका नेत्याचा काळ आठवा की घरातून सरकार चालवलं,” असं म्हणत केणेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली.
भाजपकडून दुष्काळ निवारणीची अंमलबजावणी!
दरम्यान, “भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार खऱ्या अर्थाने ही दिवाळी शेतकऱ्यांच्या बाबतीत सुख-समृद्धीची जावो या उद्दिष्टाने कामाला लागलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्या मनामध्ये दीपप्रज्वलित करण्याची भावना, समृद्धी त्यांच्यापर्यंत नेण्याची भावना सरकारने आखली आहे. निश्चितपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दुष्काळामधून निवारणामध्ये अंमलबजावणी सुरू आहे. जिथे कमी तिथे आम्ही हीच भूमिका आता सरकारने ठेवली आहे,” असंही ते पुढे बोलताना म्हणाले.
