AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता; उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी 'GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता' असे म्हटले आहे.

Uddhav Thackeray: GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता; उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
मोहन भागवतImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 1:11 PM
Share

सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने तर देशात खळबळ माजली. भाजप आणि देशातील जेन झी, जेन अल्फा पिढीतील विसंवाद जंतरमंतरवरील CJP आंदोलावरून समोर आला. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणाईशी संवाद साधला. आता शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ‘GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता’ असे म्हणत खोचक टोला लागवला आहे.

“भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता”

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात सर्व लोक बोलायला लागले आहे. मोदी सरकार विरोधात बोलत आहे. फसवणुकीचे दिवस गेले. अच्छे दिन वाट बघता बघता वाईट दिवस येत आहे. यासाठी सरकारने पाठिंबा दिला नव्हता. मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तरुण म्हणत होते हे आता काय करता? तुमचं सरकार असं वागत असताना तुम्ही का गप्प बसला? आताही अमित शाह यांचा राजीनामा मागितला जात आहे. संघाचं सरकार ऐकत असेल तर भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी अमित शाह यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

पक्ष आणि चिन्हाबाबत काय म्हणाले?

पुढे ते शिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी बोलताना म्हणाले की, आम्ही चार वर्षापासून निकालाची वाट पाहत आहोत. आता निकाल लागेल असं वाटतं. आता प्रश्नोत्तरे सुरू आहे. निवडणूक आयोगाने आमची घटना त्यांच्याकडे नाही असं म्हटलं. नसेल तर आमच्याकडे मागायला हवी होती. घटना नाही म्हणून निकाल नाही बदलू शकत. आता कोर्टात सुनावणी सुरू आहे. आम्ही आशादायी आहोत. कुणावर अन्याय निकाल नको. संविधानानुसार निकाल हवा. देशात सर्व लोक बोलायला लागले आहे. मोदी सरकार विरोधात बोलत आहे. फसवणुकीचे दिवस गेले. अच्छे दिन वाट बघता बघता वाईट दिवस येत आहे. यासाठी सरकारने पाठिंबा दिला नव्हता. आम्ही कोर्टात मुद्दा मांडणार आहोत. जनतेच्या न्यायालयात पहिल्यांदा मांडतोय. कुणाच्या पाठिशी हा भाग वेगळा. पण गद्दारांना पंतप्रधान भेटतात आणि पाठिशी उभं राहण्याचं आश्वासन देतात हे निंदणीय आहे.

ही लढाई शिवसेनेपुरती नाही. गद्दारीचा हा व्हायरस देशभर पसरत आहे. मोदींनी इतर पक्षातील गद्दारांनाही हा संदेश दिला का. आमच्याकडे या.. तुमच्या केसालाही हात लागणार नाही. मी तुमच्यापाठी आहे. मोदींची धमकी कुणाला. शाह, फडणवीस की कोर्टाला. याचा खुलासा झाला पाहिजे. हा गद्दारीचा व्हायरस देशभर पसरत आहे. मी सर्वांना आवाहन करतो आपण लोकशाहीसाठी लढलं पाहिजे. देशातील तरुणाचं माथं भडकलं आहे. यांनी कितीही प्रयत्न केला तर तरुण ऐकायला तयार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?