AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी, थेट घेतला मोठा निर्णय, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता..

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवरील अत्याचार प्रचंड वाढत आहेत. त्यातच आता पाकिस्तानने स्वत:च्या काही गोष्टी लपवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. भारताने पाकिस्तानच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे.

पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी, थेट घेतला मोठा निर्णय, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता..
Pakistan occupied Kashmir
| Updated on: Aug 08, 2026 | 1:14 PM
Share

पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाकडून सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार करण्यात आला, ज्याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाली. पाकव्याक्त काश्मीरचे लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. महागाई, बेरोजगारी आणि विजेच्या वाढलेल्या दराविरोधात लोक रस्त्यावर उतरले. यादरम्यानच आता पाकव्याप्त काश्मीरमधील बनावट निवडणूक प्रक्रियेचे पितळ पुन्हा उघडकीस आले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांचा संताप तीव्र होत असताना कायदा-सुव्यवस्थेची स्थिती असतानाच PoK निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या मतदानाचा तिसरा टप्पा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल. यातून पाकिस्तानी सरकारचे खरे रूप पुढे आले.

यादरम्यानच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया फेटाळून लावली. पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यावर पांघरूण घालण्याच्या उद्देशाने रचलेले हे एक ढोंग असल्याचे भारताने म्हटले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन उभे करत आहेत. त्यातच जर आता निवडणुका झाल्या तर पाकिस्तानचा घरा चेहरा जगापुढे येऊ शकतो, ही त्यांना भीती आहे.

पीओके निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पुंछ आणि सुधनोटीमधील एकून सात विधानसभा जागेसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार नाही. या भागात हिंसाचार आणि बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती यामुळे गृहसचिवांकडून प्राप्त झालेला अहवाल यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. पाकिस्तानी सरकारविरोधात पीओकेतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. दररोज आंदोलने केले जात आहेत.

त्यातच आता याच्याच भीतीने थेट निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शुल्क कारणे दाखवून घेण्यात आला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बनावट निवडणूक प्रक्रिया म्हणजे पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आणि मानवी हक्क्यांचे गंभीर उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे अत्याचार होत आहेत. त्यातच आता निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्यात.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत