AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे संतापले, म्हणाले, सरकारला नासकी सवय, 30 ते 35 मंत्री या नाही तर दोघे…

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही न्याय देवतेचे सन्मान करतो आणि प्रत्येक आदेशाचे पालन करतो. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.

मोठी बातमी! मनोज जरांगे संतापले, म्हणाले, सरकारला नासकी सवय, 30 ते 35 मंत्री या नाही तर दोघे...
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 02, 2025 | 11:12 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये ते मोठ्या संख्येने जमले आहेत. आंदोलकांच्या गाड्यांमुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी बघायला मिळाली. कोर्टाने यावर भाष्य केल्यानंतर रात्री आंदोलकांनी रस्त्यावरील गाड्या हलवल्या. नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा देत म्हटले की, आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल. शिंदे समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतलीये.

मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसले आहेत. सरकारने भीती दाखवली तरीही आम्ही मागे हटणार नाहीत. मी तर मेलो तरीही या आझाद मैदानातून हटत नाही, काय व्हायचे ते होऊद्या. याचे दुश्मपरिणाम तुम्ही (देवेंद्र फडणवीस) जाणे आणि मराठे जाणे. मराठे काय असतात ते पुन्हा साडेतीनसे वर्षांनी बघायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. सरकारला नासकी सवय लागल्याचेही त्यांनी म्हटले.

पुढे जरांगे पाटील यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे कुटील डाव खेळू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेला खोटी माहिती देतात. आमची सरकारसोबत चर्चा करायची तयारी आहे. 30 ते  35 मंत्री या नाही तर दोघे या आमची चर्चा करण्याची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांचा आम्ही सन्मान करू. कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायच्या नसतो, असे म्हणत त्यांनी थेट सरकारला मोठा इशारा दिला आहे.

कितीही आडवे तरीही तुम्हाला मराठ्यांची पोरं मुंबईत शनिवार रविवारच्यानंतर दिसतील. देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे हे आंदोलन सुरू आहे. मराठे मुंबईत येणार, त्यांना कोणीही अडवू शकत नाही, ते मुंबईत येणार. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात अजूनही काही नाही. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलाय. त्यांनी आम्हाला परवानग्या दिल्या नाहीत, भाकरी दिल्या नाहीत, पाणी दिले नाही, असे म्हणताना जरांगे पाटील हे दिसले आहेत. सध्या मराठा उपसमितीचे बैठक देखील सुरू आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल