मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा, म्हणाले, चार ते पाच तासात…
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला आहे. हेच नाही तर अजून काही लोक मुंबईमध्ये येऊ शकतात, असे त्यांनी थेट म्हटले आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच मुंबई फक्त आझाद मैदानावर उपोषण करता येईल, बाकी कुठेही नाही, असे स्पष्ट कोर्टाने म्हटले. आता मनोज जरांगे पाटील त्यावर बोलताना दिसत आहेत. जरांगे पाटील यांनी म्हटले की, आम्ही मागील 22 वर्षापासून उपोषण करत आहोत, आतापासून नाही. मुंबई पोलिसांनी आझाद मैदान मोकळे करण्याचे आदेश आणि तसे पत्र जरांगे पाटील यांना दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शांतता मार्गे आंदोलन करत आहोत. कायद्याच्या चाैकटीत राहून आमचे आंदोलन सुरू आहे. कोर्ट हे आंदोलनाच्या बाजूने न्याय करेल, अशी आशा आम्हाला आहे. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहने हटवली आहेत. आता मुंबईत कुठेही वाहतूककोंडी नाहीये. आम्हाला 100 टक्के न्याय मिळणार आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत.
पुढे जरांगे पाटील यांनी म्हटले, मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत. न्यायदैवतेने आम्हाला आतापर्यंत न्याय दिलाय आणि आताही आमच्याबाजूने न्याय करेल. हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असे स्पष्टपणे म्हणताना जरांगे पाटील यांनी म्हटले. आम्ही शांततेत अमरण उपोषणाला बसलो आहोत. आम्ही रात्री सांगितले की, रस्त्यावरील गाड्या काढा आणि मैदानात लावा, त्यानंतर चार ते पाच तासात आमच्या पोरांनी सर्व गाड्या काढल्या, यापेक्षा अधिक पालन काय करायला पाहिजे. आम्ही कायद्याचे आणि न्याय देवतेचे पालक करतो.
पुढेही आम्ही न्याय दैवता सांगेल तसे पालन करू. काहीही वेळ आली तरीही आम्ही पालन करू. सरकाराने आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन किंवा अजून कुठेही जाऊन काहीही केले तरीही मी सरकारला सांगतो आणि फडणवीसांना सांगतो की, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईत सोडत नाही…मराठा आणि कुणबी एकच आहे या जीआरशिवाय मुंबईत सोडत नसल्याचे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.
राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असेही जरांगे यांनी म्हटले. शिंदे समितीने दस्तावेज शोधणे गरजेचे आहे. सर्व आंदोलकांनी नियमांचे पालन करा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या माध्यमातून पोरांवर लाठीचार्ज करण्याचा विचारही करू नये. यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, नाही तर देवेंद्र फडणवीसांना दाखवून देऊ मराठा काय आहेत.
