अगोदर टिंगल करता आणि आता आरती ओवाळता, तुमचा जाहीर निषेध, संजय राऊत यांच्यावर कोणी केली जहरी टीका

| Updated on: Dec 18, 2022 | 8:24 PM

खासदार संजय राऊत यांनी महामोर्चावर टीका करणाऱ्यांना दुसऱ्या एका ट्विटमधून उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.

अगोदर टिंगल करता आणि आता आरती ओवाळता, तुमचा जाहीर निषेध, संजय राऊत यांच्यावर कोणी केली जहरी टीका
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडी आणि मित्र पक्षानी दोन दिवसापूर्वी महामोर्चा काढला होता. या मोर्चा संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याची टीका केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांना ट्विट करून प्रत्युत्तर दिले. खासदार संजत राऊत यांनी महामोर्चावर टीका झाल्यानंतर दोन ट्विट केले होते. त्या एका ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज, देवेंद्र जी हे वागणे बरे नाही असा टोला त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

 

त्यामुळे आता मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक अंकुश बाबा कदम यांनी टीका केली आहे. त्यामुळे विरोधकांकडून काढण्यात आलेला महामोर्चावर आणि संजय राऊत यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

 

तर खासदार संजय राऊत यांनी महामोर्चावर टीका करणाऱ्यांना दुसऱ्या एका ट्विटमधून उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.

तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असे दोन ट्विट केले होते. त्यानंतर मराठी मोर्चाकडून खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला.

संजय राऊत तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचे जुने व्हिडीओ शिल्लक सेनेची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. राजकीय फायद्याचा विचार करत असाल तर हा तुमचा ढोंगीपणा आहे अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.

ज्या मोर्चाची मुका मोर्चा म्हणून तुम्ही टिंगल उडवली होती. त्याच मोर्चाचा आधार तुम्हांला घ्यावा लागत असेल तर तुम्ही प्रायश्चित्त करायला हवे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. असे म्हणत संजय राऊत यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.