AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाकी सगळ्यासाठी कॉम्प्रमाईज, पण शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज, कोण म्हणालं असं…

धारवाडजवळ झालेली शिवाजी महाराजांची लढाई आणि ती करून पन्हाळा गडावर निघत असताना त्यांनी बेळगावमधून पन्हाळा गडाकडे प्रस्थान केले होते.

बाकी सगळ्यासाठी कॉम्प्रमाईज, पण शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज, कोण म्हणालं असं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 18, 2022 | 7:31 PM
Share

बेळगावः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा जवळचा संबंध आहे. दक्षिणविजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रस्थान केले तेव्हापासून बेळगाव आणि पन्हाळा गडाचा सहसंबंध असल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. होनगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी माजी खासदार संभाजीराजे बोलत होते. यावेळी दक्षिणेकडे केलेली जिंजीपर्यंतची लढाई ही मराठी स्वराज्यासाठी होती कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले स्वराज्य सुराज्य व्हावे हीच त्यांची इच्छा होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी लढाई स्वराज्यासाठी केली म्हणजेच आपल्या माणसांना सुराज्य मिळावे यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लढाया केल्या आणि त्या त्यांनी जिंकल्याही.

त्यामुळे धारवाडजवळ झालेली शिवाजी महाराजांची लढाई आणि ती करून पन्हाळा गडावर निघत असताना त्यांनी बेळगावमधून पन्हाळा गडाकडे प्रस्थान केले होते.

तेव्हापासून बेळगाव आणि महाराष्ट्राचा संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून आपला आणि कर्नाटकचा संबंध आहे.

त्यामुळे कर्नाटक सरकारने येथील मराठी भाषिकांची काळजी घेण्याची त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर जगाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराज यांची महती गाजत आहे. प्रत्येक क्षेत्रात शिवाजी महाराजांच्या कार्याची वेगळेपण दिसून येत असल्याचे मतही त्यांनी सांगितले.

आज बेळगावसारख्या भागात मला बोलवून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा जो सन्मान केला आहात. तो कायमस्वरूप लक्षात घेण्यासारखा असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र, कर्नाटकात येऊन लढाया केल्या मात्र त्यापाठीमागे सुराज्याची भावना होती. तेव्हापासून मराठी आणि बेळगावचा सबंध असल्याचे सांगत कर्नाटक सरकारने येथील मराठी भाषिकांची काळजी घ्यावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला